मुंबई CM Shinde on PM Modi : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड लिंक रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर इथं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर आता पंतप्रधानांच्या भाषणापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे. याला कारण ठरलंय ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत पंतप्रधानांच केलेलं कौतुक. 'पंतप्रधानांच्या कामात प्रभू श्रीराम आहेत' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मोदींचं तोंडभरुन कोतूक : या कार्यक्रमात आपल्या भाषणाची सुरुवातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदीतून केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "मागील दहा वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा खूप विकास झाला आहे. पंतप्रधानांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे, त्यासाठी आधी मी मोदीजींचं अभिनंदन करतो. लोकसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान मोदी, एनडीए आणि महायुतीला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी खोटे नेरेटिव्ह सेट केले. सर्वांनी एकत्र येऊन आमच्या विरोधात हे कारस्थान रचलं. 2024 ला मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यास संविधान बदलतील ही लोक भावना निर्माण करणं हा त्याचाच एक भाग होता. पण, मी तुम्हाला सांगतो खोट नेहमीच तात्पुरतं असतं. सत्याचा नेहमीच विजय होतो. विरोधकांनी पराभवाची हॅट्ट्रिक केली आणि इकडे पेढे वाटत फिरत होते. त्यांना 100 जागा देखील जिंकता आल्या नाहीत."
मोदींच्या कामात राम : पुढं बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "हे लोक जेव्हा विधान भवनात पेढे वाटत होते, त्यावेळी मी त्यांना विचारलं, हे पंतप्रधान मोदींच्या विजयी हॅट्रिकची मिठाई आहेत का? त्यावर त्यांना उत्तर देखील देता आलं नाही. पंतप्रधान मोदींच्या कामात प्रभू राम आहेत. बाबासाहेबांचं संविधान तुमच्या पाठीशी आहे. जेव्हा-जेव्हा मोदीजी महाराष्ट्रात येतात तेव्हा ते महाराष्ट्राला नवे प्रकल्प देतात. तुम्ही विकासाचे प्रतीक आहात. स्टेजवर येण्यापूर्वी मी मोदीजींशी लाडकी बहीण योजना, मोफत गॅस सिलिंडर योजना, तसंच मोफत शिक्षण योजनेबद्दल बोलत होतो. केंद्रानं दिलेला सर्व पैसा महाराष्ट्र राज्यासाठी वापरला जातो. मी वचन देतो मोदीजी, आम्ही परिश्रम करु आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेत जिंकू."
हेही वाचा :