ETV Bharat / state

उत्तर प्रदेशनंतर पुण्यातही चालणार का बुलडोझरनं कारवाई, मुख्यमंत्र्यांकडून 'या' अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश - Pune Drug Case

Pune Drug Case पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसचं अमली पदार्थ्यांशी निगडीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलिस आयुक्त अमितेशकुमारांना दिले आहे. वाचा सविस्तर..

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 11:24 AM IST

पुणे Pune Drug Case: 'विद्येचं माहेरघर असलेलं पुणे' शहर 'हिट अँड रन प्रकरण' आणि ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. शहरातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरण शांत झालं नसतानाचं आणखी एका ड्रग्ज प्रकरणामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यामुळे पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसचं अमली पदार्थांशी निगडीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिलं आहे.

पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते उपाय योजावेत. विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरू करावी असं निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी देले आहेत.

काय आहे प्रकरण: पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील 'एल ३ द लिझर' हॉलेटमध्ये अमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ व्हार झाला आहे. यामुळे पुण्यात आणखी वादळ निर्माण झालं आहे. व्हिडिओमध्ये चक्क हॉटेलमधील वॉश रुममध्ये टॉयलेटजवळ बसून तरुण ड्रग्ज घेतांना आढळले. या प्रकरणात पुणे पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला असून ८ आरोपींना अटक केलीय. एका आरोपीचा शोध सुरू आहे. तसचं दोन पोलीस कर्मचाऱ्यांवही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. पबमध्ये पार्टीच आयोजन कसं करण्यात आलं, याबाबतचा तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे.

पबसंस्कृती वाढू देणार नाही, भाजपा धीरज घाटे: भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, "शिक्षणाचं माहेघर आणि आयटी उद्योगाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात पब संस्कृती वाढू देणार नाही. या प्रकरणी पोलीस अधिकारी अधिकारी, महापालिका काहीही करणार नसेल तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत."

  • निव्वड पैसे आणि हप्ताच्या नादात पुण्याचं नाव बरबाद: या प्रकारणावरून नगरच्या कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागावर टीका केली आहे. निव्वळ पैसे आणि हप्ताच्या नादात पुण्याचं नाव बरबाद करण्याचं काम ही मंडळी करीत आहेत. आम्ही रस्त्यावर उतरून या लोकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, येणाऱ्या अधिवेशनात या विषयावर आम्ही बोलणार, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा

  1. महायुतीत मिठाचा खडा, "अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावा", चंद्रकांत पाटलांवरील 'त्या' टीकेवरुन प्रवीण दरेकर संतापले - Pune FC Road Drug Case
  2. पुणे ड्रग्ज प्रकरण; 8 आरोपींना अटक, दोन पोलीस आणि दोन बीट मार्शल निलंबित - Pune Drug Case
  3. पुणे ड्रग्ज प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; म्हणाले.... - Pune FC Road Drug Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.