ठाणे CM Shinde Helped Injured : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दौऱ्यानिमित्त नेहमी प्रवास करत असतात. या प्रवासा दरम्यान रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करताना अनेकदा पाहायला मिळालेले आहे. आज पुन्हा एकदा याच गोष्टीचा प्रत्यय कळवा पुलावर पाहायला मिळाला. (Thane Kalwa Bridge Accident ) पुलावर अपघात झाल्यावर लागलीच उतरून अपघातग्रस्तांना आपल्या वाहनातून मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात दाखल केले. या त्यांच्या कृतीमुळे मुख्यमंत्र्यांचा दयाळू स्वभाव पाहायला मिळाला आहे. (CM Shinde Helped Injured)
'त्या' जखमींवर शासकीय खर्चातून उपचार : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकात ओवरब्रिज कोसळून 27 नोव्हेंबर, 2022 रोजी मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये निलिमा रंगारी नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. तर 2 प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून मृत महिलेच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. शिवाय जखमींवर शासकीय खर्चातून वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश दिले गेले.
रोहित पवारांची जखमींना मदत : सामान्य माणूस अपघातग्रस्त होवो वा तो दु:खात असताना नेतेमंडळींना त्याचं सोयरंसुतक नसतं असं म्हटलं जातं. मात्र हे चुकीचं आहे. याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यात 19 नोव्हेंबर, 2020 रोजी झालेल्या एका अपघातात आला. ज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अपघातातील जखमींना मदत केली. जमिनीवर पाय असलेला लोकप्रतिनिधी म्हणून जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. रस्त्यात जाताना खटाव-माण तालुक्याच्या हद्दीवर अपघातग्रस्तांना त्यांनी केलेली मदत आणि दिलेला वेळ त्यांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. त्यांच्या या मदतीच्या वृत्तीमुळे उपस्थितांमधून कौतुक झाले.
शेतकऱ्याच्या वाहनाला अपघात : जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि मातोश्री सुनंदाताई पवार हे कराड येथून नातेवाईकांच्या अंत्यविधीवरुन बारामतीकडे निघाले होते. त्यांचे मित्र छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे व इतर यांच्यासोबत वडूज ते गोंदवले प्रवास सुरू होता. मांडवे (ता. खटाव) ते पिंगळी (ता. माण) दरम्यान अपघातग्रस्त वाहन त्यांना दिसले. दहिवडी येथील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी नेत असताना झालेल्या अपघातात वाहन रस्ता सोडून उलटले होते.
वलय असूनही पाय जमिनीवर : आमदार रोहित पवार यांनी गाडी थांबविण्यास सांगून तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. जखमी शेतकऱ्याची चौकशी करत अपघातग्रस्त गाडी स्वतः ढकलत रस्त्यावर आणली. राजकारणात पवार घराण्याचे मोठे वलय लाभलेले आमदार रोहित पवार राजकारणात असुनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.
हेही वाचा :
- संजय राऊतांचे भाऊ आणि पोलिसांमध्ये मतदान केंद्राबाहेर वादावादी, कारण काय? - Lok Sabha Election 2024
- मतदान सुरळीत होण्यासाठी मतदारांना मदत करा, आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगाच्या नियोजनावर व्यक्त केली नाराजी - Lok Sabha Election 2024
- गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी पोहोचले मतदान केंद्रावर; नेमकं काय घडलं? - Lok Sabha Election 2024