ETV Bharat / state

मुंबईत हलक्या वाहनांना टोलमाफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रिमंडळात घोषणा - TOLL FREE ENTRY TO MUMBAI

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज (14 ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

CM Eknath Shinde announcement toll exemption for light motor vehicles in mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2024, 11:25 AM IST

Updated : Oct 14, 2024, 12:32 PM IST

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य वाहन चालकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय. मुंबईतील प्रवेश करण्यासाठी असलेल्या मार्गांवरील पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली. आज (14 ऑक्टोबर) रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारनं केलेली ही घोषणा मास्टरस्ट्रोक मानला जातोय.

वाहतूकदारांना मोठा दिलासा : राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू आहे. या बैठकीत अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु, या बैठकीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तो म्हणजे मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यावर आता हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्यात आलीय. यामध्ये वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर या टोलनाक्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळं वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं बोललं जातंय.

जड वाहनांना टोलमधून सुटका नाही : एकीकडं वाहतूकदार आणि प्रवाशांना सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडं जी जड वाहनं आहेत, त्यांना मात्र टोलमधून सुटका नाही. या जड वाहनांमध्ये टेम्पो, ट्रक, खासगी बसेस आदी वाहनांचा समावेश होतो. यामुळं यांना टोल भरावाच लागणार आहे. परंतु, जी हलकी वाहनं आहेत त्यांच्यासाठी मात्र सरकारनं टोल माफी करून विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा फायदा निवडणुकीत होईल की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. वाहन चालकांची FASTag मधून मुक्ती? नवीन टोल धोरणाला मान्यता - satellite based toll system
  2. पुणे-कोल्हापूर मार्गावरील टोलविरोधात काँग्रेस आक्रमक : कामं पूर्ण होईपर्यंत ५० टक्के टोल कमी करण्याचा प्रस्ताव - Satej Patil
  3. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे आणि अपघात; शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रोखली 'घोटी टोल' नाक्यावर वाहतूक - Mumbai Nashik Highway

Last Updated : Oct 14, 2024, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.