ETV Bharat / state

बीडीडीसह मुंबईतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; 'हे' आहे कारण - Lok Sabha election 2024

Lok Sabha election 2024 Boycott : दक्षिण मुंबईतील जुन्या बीडीडी वासियांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे विविध नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी मुंबईतील इतर भागातील नागरिकांनी बहिष्काराचा इशारा दिला आहे.

Boycott of Lok Sabha elections
Boycott of Lok Sabha elections
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 7:38 PM IST

नागरिकांच्या प्रतिक्रिया

मुंबई Lok Sabha election 2024 Boycott : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना मुंबईतील अनेक भागातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. विविध नागरी समस्यांची सोडवणूक न झाल्यामुळं नागरिकांनी मदानावर बहिष्करा टाकण्याचा निर्णय घेतालय. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळं नागरिक संतप्त झाले आहेत.

बीडीडीवासीयांचा मतदानावर बहिष्कार : दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील जोशी मार्ग येथील शेकडो मतदारांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात वरळी येथील पुनर्विकासातील सदनिकांना प्रत्येक घरामागे एक पार्किंग देण्यात येणार आहे. तसा निर्णय सरकारनं नुकताच घेतला आहे. मात्र, हा निर्णय नाम जोशी मार्ग आणि नायगाव प्रकल्पात लागू करण्यात आलेला नाही. एकाच पुनर्विकास प्रकल्पातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय देऊन सरकार आमच्यावर अन्याय करीत आहे. आम्हालाही प्रत्येक घरामागं पार्किंग मिळालंच पाहिजे, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्र्याकडं सातत्यानं पाठपुरावा करत आहोत, मात्र त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही, असं स्थानिक नागरिक सुरेश मोरे यांनी सांगितलं. तर सातत्यानं आम्ही पाठपुरावा करूनही सरकारला जाग येत, नसेल तर नाईलाजानं आम्हाला येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकावा लागेल, असं बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी सांगितलं.

शिवाजी पार्क मैदानातील माती काढा : शिवाजी पार्क मैदानामध्ये लाल माती धुळीमुळं उडत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबई महापालिकेला नोटीस बजावली होती. मंडळानं त्यांना माती पंधरा दिवसात काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकेकडून अत्यंत संथ गतीनं काम सुरू असून नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी मुले खेळत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात लाल मातीची धूळ उडून प्रदूषणाचा त्रास लोकांना होत आहे. या संदर्भात प्रदूषण मंडळानं पत्र पाठवूनही महापालिकेकडून कारवाई होत नाहीय. त्यामुळं आम्हाला आमचे हक्क मिळत नसतील तर, मतदान का करायचं असा सवाल उपस्थित करीत शिवाजी पार्क रहिवासी संघटनेचे नेते प्रकाश बेलवडे केलाय.

पाण्यासाठी गोराईकरांचा बहिष्कार : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली नदीच्या गोराई परिसरातील नागरिकांनीही या भागात पाणीपुरवठा होत नसल्यानं लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाणीटंचाईला सामोरे जावं लागत आहे. पाण्याची समस्या सातत्यानं भेडसावत असून सरकार त्याकडं दुर्लक्ष करत आहे. या भागातील भंडारवाडा, जुईपाडा, कोळीवाडा येथे पाणी येत नाही. गोराई उत्तन या भागात जलवाहिनी आहे. मात्र, त्याला पाण्याचा दाब नाही. त्यामुळं वैराळा तलाव, शेफळी, हालावर आदिवासी पाडे या ठिकाणी पाणी येत नाही. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही काही होत नाही. त्यामुळं आता निवडणुकीवर बहिष्कार घालण्यास शिवाय पर्याय नाही, असं या भागातील नागरिक नामदेव पवार, लुईस डिसोजा यांनी सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निवडणूक 2024 मतदान : दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान - Lok Sabha Election 2024
  2. भाजपाला देशाचं संविधान बदलायचंय, पण आम्ही बदलू देणार नाही - सुप्रिया सुळे - Supriya Sule Exclusive IV
  3. नवनीत राणांनी केलं मतदान; सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएमबाबत दिलेल्या निर्णयावर दिली 'ही' खास प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.