ETV Bharat / state

नवजात बालकांची पाच लाखात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा महिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी - Child Trafficking Pune - CHILD TRAFFICKING PUNE

New Born Baby : पिंपरी चिंचवड शहरात नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. ही कारवाई शुक्रवारी जगताप डेअरी परिसरात केलीय. अटकेतील सहा महिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

New Born Baby
नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश; सहा महिलांना अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 9:10 AM IST

Updated : Apr 14, 2024, 1:09 PM IST

डॉ विशाल हिरे, सहाय्यक पोलिस आयुक्त वाकड विभाग

पिंपरी चिंचवड New Born Baby : पिंपरी चिंचवड शहरात नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी 6 महिलांना अटक केली आहे. या महिलांना पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी महिला या सराईत गुन्हेगार असून त्यांनी आतापर्यंत 5 बालकांची तस्करी केल्याच तपासात उघड झालंय.

सापळा रचून घेतलं महिलांना ताब्यात : सहायक आयुक्त विशाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांना एका बालकाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी वाकड पोलिसांनी आरोपींची माहिती घेऊन सापळा रचत त्यांना बाळ खरेदी करण्याची ऑफर दिली. शुक्रवार रोजी संध्याकाळी दोन रिक्षामधून काही महिला जगताप डेअरी परिसरात आल्या होत्या. पोलिसांनी सापळा रचून महिलांकडे नवजात बालकांबाबत चौकशी केली. यात त्या महिलांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यांचे मोबाईल तपासले असता त्यांनी संबंधित बाळ विकणार असल्याचं संभाषण केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. ही माहिती समोर येताच पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं.

5 लाखात नवजात बालकांची तस्करी : पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या महिला संबंधित बालकाला पाच लाख रुपयांना विकणार असल्याचं त्यांनी कबूल केलं. महिलांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्व महिला आरोपींना 16 एप्रिलपर्यंत म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. संबंधित महिला या सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी याआधीही पाच बालकांना लाखो रुपयांसाठी विकल्याचं कबूल केलंय. या रॅकेटचे पाळंमुळं शोधून काढण्यासाठी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. ग्रीन कार्डच्या हव्यासापोटी मित्रांबरोबर अदला-बदली करण्याची बळजबरी, अमेरिकेहून परत येताच महिलेची पतीविरोधात तक्रार - Meerut Wife Swapping Case
  2. तालिबानपेक्षाही भयंकर! पंजाबमध्ये महिलेला विवस्त्र करत काढली धिंड, काय आहे संपूर्ण प्रकरण - NAKED PARADE women punjab
  3. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रशांतच्या हत्या प्रकरणात तरुणीसह प्रियकराला अटक, गुन्ह्याचं काय कारण? - badminton player Prashant murder

Last Updated : Apr 14, 2024, 1:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.