ETV Bharat / state

पुन्हा संधी दिल्यास लाडक्या बहिणींना 90 हजार देणार - अजित पवार - Ajit Pawar - AJIT PAWAR

AJIT PAWAR - आमच्या सरकारला महिलांनी आणखी एक संधी दिल्यास येत्या पाच वर्षात लाडक्या बहीणींच्या खात्यात एकूण नव्वद हजार रुपये जमा करण्याची सरकारची योजना आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 5:02 PM IST

खेड (आळंदी) AJIT PAWAR : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारनं महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा केले आहेत. ही रक्कम 1 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात जमा झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ शनिवारी पुण्यात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. आमच्या लाडक्या बहिणींना आणखी एक संधी दिल्यास आम्ही येत्या पाच वर्षांत एकूण नव्वद हजार रुपये महिलांना द्यायला तयार आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

90 हजार रुपये देणार : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी खेड आळंदीत सभा घेतली. यावेळी अजित पवार यांनी चाकणच्या संतोषनगर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त युवा संवाद सभेला संबोधित केलं, तर खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे शेतकरी, महिलांशी संवाद साधला. सरकारनं महिलांसाठी 4 योजना आणल्या आहेत. सर्वांची काळजी घेणारं हे सरकार आहे. आगामी काळात महिलांच्या खात्यात पाच महिन्यांसाठी साडेसात हजार रुपये जमा होतील. आमच्या सरकारला आणखी एक संधी दिल्यास येत्या पाच वर्षात तुमच्या खात्यात 90 हजार रुपये जमा होतील, असं अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या समारंभावेळी सांगितलं.

अमोल कोल्हेंवर तटकरेंची टीका : खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड परिसरात शेतकरी, महिला संवाद कार्यक्रमाची सांगता झाली. "आम्ही आमच्या बहिणींसाठी 'माझी लाडकी बहीण योजना' आणली आहे. 90 लाख माय माऊलींच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. आज 50 कोटी महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. गरिबी कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आम्ही सरकारमध्ये नसतो, तर अशा योजना आम्हाला राबता आल्या नसत्या, असं अजित पवार म्हणाले. तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आळंदी खेड तालुक्यातील जन सन्मान यात्रेची माहिती देताना खासदार अमोल कोल्हे तसंच सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. "अमोल कोल्हे कलाकार आहेत. कलाकार असल्यानं क्रिएटिव्ह असण्याची सवय आहे. आम्ही सुरू केलेल्या योजनेमुळं त्यांना नक्कीच नैराश्य आलं असावं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याकडं फार लक्ष देण्याची गरज नाही", अशी टीका सुनील तटकरे यांनी केलीय.

लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती क्रीडा संकुलाचा परिसर महिला भगिनींनी खचाखच भरलेला होता. महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. स्वागत समारंभात महिलांच्या ढोल ताशा पथकानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत केलं. पुण्यातील उरुळी कांचन परिसरातून आलेलं "कला ढोल ताशा पथक" सर्व मंत्र्यांच्या आकर्षणाचं कारण ठरलं. यावेळी आदिवासी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास राख्या बांधून त्यांचे आभार मानले. लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाल्याच्या आनंदात भोर तालुक्यातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलंत का :

  1. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोड्यानं मारा - मुख्यमंत्री - Majhi Ladki Bahin Yojana
  2. गेल्या दोन वर्षात राज्यात शिंदेंचं इंजिन दुप्पट वेगानं धावलं; ठाकरेंपेक्षा दुप्पट फाईल्सचा निपटारा तर तिप्पट कामांना मंजुरी - Maharashtra CM Sign Files
  3. महाविकास आघाडीचा आर या पारचा नारा : "एक तर तू राहशील किंवा मी राहीन...", आघाडीनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग - Maharashtra Assembly Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.