ETV Bharat / state

मुख्यमंत्री आज रत्नागिरी दौऱ्यावर, 400 कोटींच्या विविध विकासकामांचं करणार भूमिपूजन - CM On Ratnagiri tour today

Eknath Shinde on Ratnagiri tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते 400 कोटींच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन करणार आहेत, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 9:29 AM IST

रत्नागिरी Eknath Shinde on Ratnagiri tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पर्यटन योजनेंतर्गत जलक्रीडा प्रकल्प, बंबू मुलावर्धन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

400 कोटींच्या विविध विकासकामांचं होणार भूमिपूजन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 मार्च रोजी दापोली दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या हस्ते खेड-दापोली विधानसभा मतदारसंघातील सुमारे 400 कोटींच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

हर्णे बंदरासाठी 205 कोटींची तरतूद : यावेळी आमदार योगेश कदम म्हणाले, "राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दापोली मतदार संघातील काही प्रमुख महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची विनंती केली होती. त्यापैकी ऐतिहासिक वारसा असलेलं हर्णे बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्यासाठी 205 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात 100 खाटांचं नवीन रुग्णालय बांधण्यात आलं आहे. या रुग्णालयात अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, डायलिसिस सेंटर आदी सुविधा उपलब्ध असतील. त्यासाठी 20 कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत."

याकोण फाटा ते विसापूर रस्त्यासाठी 35 कोटींचा निधी : "खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी 98 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याकोण फाटा ते विसापूर रस्त्यासाठी 35 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दापोलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळकाई देवस्थानच्या जीर्णोद्धार करण्यासाठी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना 4 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद त्यांनी केली होती. दापोलीतील या सुमारे चारशे कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते रामदास कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित राहणार आहेत," असं कदम म्हणाले.

असा असणार मुख्यमंत्र्यांचा दौरा : मुख्यमंत्र्यांचं दुपारी 02.40 वाजता हर्णे बंदर हेलिपॅड, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे आगमन होईल. त्यानंतर ते मोटारीनं हर्णे बंदरकडे प्रयाण करतील. दुपारी 02.45 वाजता हर्णे बंदर, जेटी भूमीपूजन, दुपारी 03.00 वाजता मोटारीनं हर्णे बंदर हेलिपॅडकडं प्रयाण, दुपारी 03.20 वाजता हर्णे बंदर हेलिपॅड येथे आगमन, त्यानंतर हेलिकॉप्टरनं दापोली, हेलिपॅडकडं प्रयाण, दुपारी 3.30 वाजता, दापोली मतदार संघातील विविध विकास कामांचं भूमीपूजन, दुपारी 3.50 वाजता मोटारीनं आझाद मैदानाकडं प्रयाण, सायंकाळी 04 वाजता शिवसंकल्प अभियान मेळावा, सागरी किनारा मार्गातील केळशी येथील पुलाचं भूमिपूजन (ऑनलाईन), सायंकाळी 04 .45 वाजता मोटारीनं दापोली हेलिपॅडकडं प्रयाण, सायंकाळी 05.15 वाजता दापोली हेलिकॉप्टरनं राजभवन हेलिपॅड मुंबईकडं प्रयाण.

हे वाचलंत का :

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांची 'दिल्ली वारी' ; अमित शाहांसोबत रात्री पार पडली बैठक
  2. 'त्या' FIR मध्ये रोहित पवारांचं नाव नाही, एजन्सीची भीती दाखवली जात आहे; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
  3. "गल्लीतील नेत्यानं...", नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.