ETV Bharat / state

काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती! सैन्याचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज (19 फेब्रुवारी) देशभर उत्साहात साजरी करण्यात आली. तसंच, काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळही भारतीय सैन्यानं शिवरायांना आदरांजली वाहिली. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

in snow covered environment  army personnel salute to chhatrapati shivaji maharaj in kashmir
काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष! व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 10:48 PM IST

काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना

मुंबई Shiv Jayanti 2024 : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात सैन्यदलाच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय सैन्यातील जवानांचे अभिनंदन करीत त्यांचं कौतुक केलं. हिमवर्षावात देखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष दुमदुमला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं होतं पुतळ्याचं अनावरण : गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली. कुपवाडा येथे उणे तापमानात हा अनोखा कार्यक्रम पार पडला. सभोवताली सर्वत्र बर्फ अशा कठीण परिस्थितीतही आपल्या जवानांनी महाराजांना जयंती दिनी केलेलं अभिवादन पाहून अभिमान वाटल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, तसंच त्यांचं मनोबल उंचावत राहील, असं मुख्यमंत्री शिंदे पुतळा अनावरण समारंभात म्हणाले होते. त्याची प्रचिती आज प्रत्यक्षात दिसून आली.

शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा : 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. यावेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेनं बघत असून त्यांच्या हातात तलवार आहे. जवानांनी सुमारे 1800 ट्रक माती भरून पुतळ्यासाठी भक्कम पाया तयार केला होता.

हेही वाचा -

  1. शिवरायांचा जयजयकार करून आग्र्यातील मराठी बांधवांनी साजरी केली शिवजयंती
  2. राज्यातील पाच गडकिल्ल्यांवरील मातीतून साकारली शिवरायांची मूर्ती; किल्ले संवर्धित ठेवण्याचा दिला संदेश
  3. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते विविध लढाईंचं शिवनेरीवर सादरीकरण; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.