ETV Bharat / state

चोरट्यांनी पैशांसाठी गॅस कटरनं फोडलं एटीएम, पण पैसेच जळून खाक; पाहा CCTV - Sambhajinagar Crime News - SAMBHAJINAGAR CRIME NEWS

Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 चोरट्यांनी एटीएम गॅस कटरच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅस कटरमुळं एटीएमला आग लागली. या आगीत मशीनमधील 10 ते 10 लाख रुपयांची रक्कम जळून खाक झाल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Sambhajinagar Crime News
चोरट्यांनी गॅस कटरनं फोडलं एटीएम (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 4:17 PM IST

छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा परिसरात एसबीआय बँकेचं एटीएम गॅस कटरनं फोडल्यामुळं दहा ते पंधरा लाख रुपये जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. दोन चोरट्यांनी गॅस कटरनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असताना गॅस कटरमुळं एटीएमला आग लागली आणि या आगीत दहा ते पंधरा लाख जळून खाक झाले. त्यावेळी चोरट्यानं एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही फोडण्याचा देखील प्रयत्न केला. तेव्हा बाजूला असलेल्या व्यक्तींना जाग आल्यानं चोरट्यांनी गॅस कटर मशीन एटीएममध्ये सोडून फरार झाले. सोमवारी रात्री साडेचार वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असून, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

चोरट्यांनी गॅस कटरनं फोडलं एटीएम (ETV Bharat Reporter)

दहा ते पंधरा लाख जळून खाक : गेल्या काही दिवसांपासून बँकांचे एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. शहरातील पडेगाव आणि छावणी भागात अशा काही घटना घडल्या आहेत. त्यात आता गॅस करटनं मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना माळीवाडा परिसरात झाली. सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास माळीवाडा येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये काही तरी गडबड असल्याचं बाजूला असलेल्या एका व्यक्तीला आढळून आलं. त्यानं तिकडं धाव घेतली असता तिथं दोन चोरटे एटीएम मशीन कटरनं फोडत असल्याचं दिसलं. सदरील व्यक्ती पाहताच दोन्ही चोरट्यांनी तिथून पळ काढला. गॅस कटरनं मशीन फोडत असताना, कटरमधून निघालेल्या आगीमुळं मशीनमध्ये असलेल्या नोटांना आग लागली. त्यात दहा ते पंधरा लाखांची रोख जाळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद : सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन चोरटे एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये घुसले. त्यांनी थेट गॅस कटर काढून मशीन कापायला सुरुवात केली. त्यावेळी मशीनच्या दुसऱ्या बाजूनं ठिणग्या पडत होत्या. त्यामुळं मशीन मधल्या नोटांना आग लागली असावी. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकारणी दौलताबाद पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हेही वाचा :

  1. Video चोरट्यांची दिवाळी.. गॅस कटरने एटीएम मशीन कापून पैसे नेले चोरून, पहा व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.