ETV Bharat / state

प्रेमविवाहाला कथित मदत करणं बेतलं जिवावर, काकानंच पुतण्याच्या अंगावर घातली फिल्मीस्टाईलनं जीप, चारवेळा चिरडून केली हत्या - Sambhajinagar Murder - SAMBHAJINAGAR MURDER

Sambhajinagar Murder : प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून मावसभावाच्या मुलाच्या अंगावर चारवेळा बोलेरो गाडी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलीय. ही घटना गुरुवारी (28 मार्च) दुपारी घडली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

प्रेमविवाहाला मदत केल्यामुळं तरुणाच्या अंगावर चार वेळा बोलेरो गाडी घालून हत्या; चित्रपटालाही लाजवणारी संभाजीनगरातील घटना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 11:30 AM IST

Updated : Mar 29, 2024, 4:32 PM IST

छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Murder : चित्रपटातील दृश्याप्रमाणं आरोपीनं मावसभावाच्या मुलाचा खून केल्यानं खळबळ उडाली आहे. पवन मोढे असं मृत तरुणाचं नाव आहे. हत्या करणारा आरोपी सचिन वाघचौरे हा मृताच्या वडिलांचा मावसभाऊ असल्याचं तपासात समोर आलंय. ही घटना वाळूज भागातील शेंदूरवाधा रस्त्यावर घडली.

बहिणीच्या लग्नात मदत केल्यानं हल्ला : मिळालेल्या माहितीनुसार, मृत पवनचे वडील शिवराम आणि आरोपी सचिन दोघ सख्खे मावसभाऊ आहेत. शिवराम यांच्या भाच्यानं आरोपी सचिन वाघचौरेच्या मुलीशी प्रेमविवाह केला. त्यावर चर्चा होत असताना शिवराम यांनी मावसभाऊ सचिन याला झालं गेलं विसरून जा, असं सांगत मुलगी नात्यात आहे अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन दोघांच्या प्रेमविवाहाला शिवराम यांनी मदत केल्याचा संशय सचिनच्या मनात आला. त्यानंतर त्याचा रागाचा पारा चढला होता. त्यातच शिवराम यांचा मुलगा पवन याचं लग्न 4 एप्रिलला होणार होतं. त्यासाठी पैसे आणण्यासाठी दोघं बँकेत गेले होते. परतत असताना आरोपी आणि त्याच्या पाच साथीदारांनी त्यांच्या दुचाकीला बोलोरो गाडीनं धडक दिली. यात पवन आणि शिवराम दोघंही रस्त्यावर कोसळले.

चारवेळा गाडी घातली अंगावर : त्यानंतर आरोपींनी गाडी वळवून आणत पुन्हा बोलेरो जीप त्यांच्या अंगावर घातली. गाडी पवनच्या डोक्यावरून गेली, रागात असलेल्या आरोपीनं चारवेळा अंगावरून गाडी नेली. त्यात पवनचा जागीच मृत्यू झाला, तर शिवराम गंभीर जखमी झाले. या घटनेची वाळूज पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपी पसार झाले असून त्यांचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. राजस्थानात रक्तरंजित 'होळी'; पोलिसात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या पाच जणांची डंपरनं चिरडून हत्या - Murder In Jhalawar
  2. अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी मेहुण्याला फाशीची शिक्षा - Minor Sister in Law Murdered
  3. Aurangabad Crime: औरंगबाद जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचे रॅकेट? गोळी लागून चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू

Last Updated : Mar 29, 2024, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.