छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - राष्ट्रीय खो-खो खेळाच्या 13 वर्षीय मुलीवर प्रशिक्षकानंच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी प्रशिक्षक, हॉटेल मालक, व्यवस्थापक यांच्यावर वेदांतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी मुंबईला जावं लागेल, असे सांगून प्रशिक्षकानं खेळाडू मुलीला रेल्वे स्टेशनला बोलावले. गाडी येण्यास वेळ लागणार असल्यानं त्यानं मुलीला हॉटेलवर नेले. गुरु-शिष्याला नात्याला काळिमा लावत प्रशिक्षकानं मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. इतकंच नाही तर स्पर्धा संपल्यावर गावी गेल्यावरदेखील शरीरसुखाची मागणी केली. तिने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर मुलीच्या आईनं पोलिसात तक्रार दिली.
खो-खो खेळाच्या प्रशिक्षकानं केला अत्याचार- पैठण तालुक्यातील एका शाळेत शिकणाऱ्या मुलीला खो-खो खेळात पुढे जायचं असेल तर मोठ्या स्पर्धा खेळाव्या लागतील, असं तिला सांगण्यात आलं. क्रीडा प्रशिक्षक जगन्नाथ शिवाजी गोरडे या राष्ट्रीय खेळाडूनं तिची तयारी करून देण्याचा विश्वास तिच्या कुटुंबीयांना दिला. 25 सप्टेंबर रोजी स्पर्धेसाठी मुंबईला जावं लागेल, असे प्रशिक्षकानं कुटुंबीयांना सांगितले. त्यासाठी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर बोलावले. मुंबईला जाणारी गाडी रात्री असल्यानं हॉटेलमधे विश्रांती करू, असे जगन्नाथ गोरडे यानं मुलीला सांगितले. स्टेशन परिसरातील एका हॉटेलवर ते गेले असता एकाच खोलीत एकटेच होते. तेव्हा आरोपीनं मुलीवर बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर तिला धमकी देऊन मुंबईला खेळ खेळण्यासाठी नेले.
परत आल्यावर पुन्हा शरीर सुखाची मागणी- घाबरलेल्या खेळाडू मुलीनं कोणालाही प्रकरणाची वाच्यता केली नाही. मात्र, स्पर्धेतून परत पैठण येथे गावी गेल्यावर या प्रशिक्षकानं मुलीला तु मला आवडतेस, असं म्हणत शरीरसुखाची मागणी केली. घाबरलेल्या मुलीनं घरी आईला सगळा प्रकार सांगितला. त्यांनतर तिच्या आईनं तातडीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत वेदांत नगर पोलिसात प्रशिक्षक जगन्नाथ गोरडे, स्टेशन परिसरातील हॉटेल मालक, व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा-