ETV Bharat / state

Waluj MIDC Crime News: लघुउद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या, संभाजीनगरच्या वाळुज औद्योगिक परिसरातील घटना - Waluj MIDC Crime News

Waluj MIDC Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुज औद्योगिक परिसरातील सादापूर भागात एका लघुउद्योजकाचा खून करण्यात आलाय. ही घटना रविवारी रात्री घडलीय.

Waluj MIDC Crime News: लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या, संभाजीनगरच्या वाळुज औद्योगिक परिसरातील घटना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 10:23 AM IST

छत्रपती संभाजीनगर Waluj MIDC Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुज एमआयडीसी परिसरात साजापूर परिसरात एका लघुउद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. या हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीनं अंधाराचा फायदा घेत धुळे सोलापूर महामार्गावरुन पसार झाले. ही घटना रात्री वाळुज एमआयडीसी परिसरातील साजापूर परिसरातील बालाजी नगरात घडली. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडालीय. सचिन साहेबराव नरोडे असं हत्या झालेल्या लघुउद्योजकाचं नाव आहे. हे मारेकरी त्याच्या ओळखीचे असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि पोलीस उपायुक्त नितीन बगाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाच्या सूचना केल्या.

(ही बातमी अपडेट होत आहे.)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.