पुणे Chatrapati Sambhaji Maharaj Samadhi Sthal : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकास आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 270 कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन आज (2 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पाडलं. या भूमिपूजन सोहळ्यासाठी वढू बुद्रुक येथे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, लावण्यात आलेल्या बॅनरवर छत्रपती संभाजी महाराजांचा एकही फोटो दिसला नाही. त्यामुळं यामुद्द्यावरुन आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे फोटो : शनिवारी (2 मार्च) वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या परिसरातील विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. तसंच या भूमिपूजन कार्यक्रमाचे विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते. परंतु या बॅनर्सवर छत्रपती संभाजी महाराजांचा एकही फोटो दिसला नाही. त्यामुळं नवा वाद पेटून उठण्याची शक्यता आहे. लावण्यात आलेल्या बॅनर्सवर केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो दिसतं आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी परिसराच्या विकासाकामांचं भूमिपूजन : छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकास आराखड्यासाठी एकूण 397 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 270 कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. भूमिपूजनानंतर तुळापूर येथे सभा पार पडली. या सभेसाठीच्या आणि कार्यक्रमाच्या बॅनरवरून मात्र आता वाद होण्याची शक्यता नाही. आधीच शरद पवारांचं पत्रिकेत नाव न घातल्यानं बारामतीच्या कार्यक्रमावरुन वादळ उठलं होतं. त्यांचं नाव पुन्हा पत्रिकेत घालून सुधारणा करण्यात आली. यावेळी मात्र सुधारणेला वावच नसल्यानं नेते काय स्पष्टीकरण देतात याकडे आता लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -