ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : हैदराबाद, छत्तीसगडमधून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर प्रशासनाचा 'डोळा', जिल्हाधिकाऱ्यांचे 'हे' आदेश

आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत सूचना केल्या आहेत.

Assembly Election 2024
विधानसभा निवडणूक 2024 आढावा बैठक (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2024, 8:02 AM IST

चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नियोमी साटम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जीएसटीचे सहायक आयुक्त मोहन खोब्रागडे, आयकर अधिकारी सुरेश चौधरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू : यावेळी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा होताच जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवजणूक 2024 ही मुक्त आणि पारदर्शक वातावरणात घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चोख असणं आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयकर विभाग, केंद्रीय आणि राज्य जीएसटी विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रेल्वे पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, वन विभाग आणि इतर यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेच्या नोडल अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क ठेवून समन्वयातून काम करावं.

अवैध रोख, दारू, पैशांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना : अवैध रक्कम, दारूचा पुरवठा, संशयित बाबी, ड्रग्ज आदी बाबींच्या जप्तीबाबत निवडणूक आयोगाच्या कठोर सूचना आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं. महाराष्ट्रात निवडणुकीमुळे इकडून तिकडं पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी दक्ष असावं. आपापल्या सूत्रांच्या माध्यमातून गोपनीय माहिती मिळविण्यावर भर देऊन योग्य कारवाई करावी. जिल्ह्याच्या सीमेलगतच्या चेक पोस्टवर त्वरीत अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तपासणी दरम्यान एखादं वाहन पकडलं तर त्याचा पूर्वइतिहास तपासावा. जिल्ह्यात येणारं पार्सल तसेच बस आणि ट्रॅव्हल्समधून होणारी पार्सल वाहतुकीची तपासणी करावी.

जिल्ह्यात येणाऱ्या ट्रव्हल्सवर राहणार नजर : निवडणूक प्रक्रियेदरम्यान संशयित बाबींची जप्ती प्रकरणं वाढवणं आवश्यक आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोपनीय माहिती गोळा करावी. अवैध आणि बनावट दारुवर गांभिर्यानं लक्ष ठेवावं. गुटखा, ड्रग्ज प्रतिबंधित वस्तुंची तपासणी करावी. जिल्ह्यात अचानक एखाद्या वस्तुची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्यास जीएसटी विभागानं सदर बाब प्रशासनाला कळवावी. आयकर विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागानं नागपूर, हैदराबाद, छत्तीसगडमधून येणाऱ्या ट्रॅव्हल्स चेक कराव्यात. सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर बारकाईनं लक्ष ठेवावं. अचानक मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार होत असतील तर निवडणूक खर्च पथकाला माहिती द्यावी. पैसे ट्रान्सफर करताना संबंधितांची कागदपत्रं अधिकृत असल्याची खात्री करावी.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसाठी विशेष सूचना : मतदान यंत्र आणि स्ट्राँग रुमच्या सुरक्षा कवचाला सर्वोच्च प्राधान्य असावे. पोलिसांनी आवश्यक सुरक्षाव्यवस्था पुरवावी. यात निष्काळजीपणा होऊ देऊ नये. नामांकन प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात केवळ 3 वाहनांना परवानगी द्यावी, तसेच उमेदवारांसह एकूण पाच व्यक्तिंनाच प्रवेश द्यावा. स्ट्राँग रुमला दिवसातून दोन वेळा नियमित भेट देऊन पाहणी करावी. प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही चेक करावेत. मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सर्व सूचनांबाबत अवगत करुन प्रशिक्षण द्यावं.

हेही वाचा :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.