नागपूर RSS Chief Mohan Bhagwat Security : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख डॉ मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा हा निर्णय घेतलाय. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांच्यासारखी ASL म्हणजे अॅडव्हांस सेक्युरिटी लायझनिंग प्रकारची सुरक्षा देण्यात आली आहे.
पूर्वी सीआयएसएफची झेड प्लस सुरक्षा : डॉ मोहन भागवत यांना या पूर्वी सीआयएसएफची झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. मात्र, आता सुरक्षा ताफ्यात स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन यांचा समावेश असेल. कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेयर सुरक्षा यंत्रणा डॉ मोहन भागवत यांना पुरवण्यात येणार आहे.
सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ज्या ठिकाणी राहतील, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी फॉलोअप घेऊन एक दिवसापूर्वी त्यांचा आढावा घेण्यात येईल.
हेही वाचा :