ETV Bharat / state

शिंदे गटात गेल्यानं महिला नेत्याला ठार मारण्याची धमकी; ठाकरे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल - Thackeray Group Leader Threat - THACKERAY GROUP LEADER THREAT

Thackeray Group Leader Threat : ठाकरे गटाला रामराम ठोकून शिंदे गटात गेलेले महिला माजी नगरसेविकेसह तिच्या पतीला धमकावल्या प्रकरणी ठाकरे गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यावर ठाणे जिल्ह्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हरीचंद्र गौरु हरदास उर्फ बाळा हरदास असे धमकीचा गुन्हा दाखल झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Threat By Thackeray Group
बाळा हरदास (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 10, 2024, 4:56 PM IST

Updated : May 10, 2024, 6:23 PM IST

झालेल्या आरोपाविषयी स्पष्टीकरण देताना बाळा हरदास (Reporter)

ठाणे Thackeray Group Leader Threat : दोन दिवसात राजकारण सोडून संन्यास घ्या किंवा कल्याण सोडून निघून जा नाहीतर संपवून टाकेन अशी धमकी ठाकरे गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेलेल्या महिला माजी नगरसेविकेसह तिच्या पतीला दिली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकच खळबळ उडाली आहे. हरीचंद्र गौरु हरदास उर्फ बाळा हरदास असे धमकीचा गुन्हा दाखल झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तर माजी नगरसेवक विजया पोटे आणि अरविंद पोटे असे शिंदेच्या गटात सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

ठाकरे गटाला मोठा धक्का : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याचं काम सर्वच पक्षाकडून होत आहे. अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेत ठाकरे गटाला मोठा धक्का देत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांही शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर माजी नगरसेविका विजया पोटे यांना ठाकरे गटाकडून नेहमीच त्रास होत होता.

मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : अशातच ६ मे रोजी दुपारच्या सुमारास ठाकरे गटातील ज्येष्ठ पदाधिकारी हरीचंद्र गौरु हरदास उर्फ बाळा हरदास याही शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवक विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांना दोन दिवसात राजकारण सोडून संन्यास घ्या किंवा कल्याण सोडून निघून जा. नाहीतर संपवून टाकेन असं सांगत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या याप्रकरणी विजया पोटे यांचे पती अरविंद पोटे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

त्यांनी माझ्या हाताखाली काम केलंय : याबाबत बाळा हरदास यांना विचारणा केली असता त्यांनी मानपाडात जाऊन गुन्हा दाखल केला. ते म्हणाले की, इकडचे पोलीस त्यांची तक्रार घेणार नाही. मी सगळ्यांनाच फोन करतो. हिला एकटीला केलेला नाही. मनसे आमदार राजू पाटील, शिंदे गटाचे रवी पाटील तसेच खामकर सर्वांना फोन करतो. मी सर्वांत ज्येष्ठ आहे. सर्वांनी माझ्या हाताखाली काम केलेलं आहे. तिकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांनी काय कामे केलीय हे लोकांना सांगा, हे सांगण्यासाठी मी फोन केला होता. एकनाथ शिंदे यांना गुन्हा दाखल करण्यापेक्षा दुसरा कुठलाच पर्याय नाही. शिवसेनेच्या जीवावरती हे मोठे झालेले आहेत आणि मी सर्वांत ज्येष्ठ आहे.

मी कोणालाही दमदाटी केलेली नाही : विजया पोटे आणि तिचा नवरा हे मातोश्री वरती जात होते. त्याचा मुक्त संचार मातोश्रीला होता; मात्र नेमके यांचा जाण्याचे कारण काय हे बघण्यासाठी मी फोन केला होता. मी मुख्यमंत्र्यांसारखा कोणाला दमदाटी देत नाही, असे मत गुन्हा दाखल झालेल्या बाळा हरदास यांनी मांडले. तर याबाबत तक्रारदार शिंदे गटात गेलेल्या विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा :

  1. अरविंद केजरीवाल यांना 'सुप्रिम' दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं दिला अंतरिम जामीन, लोकसभेचा प्रचारही करणार - Interim Bail To Arvind Kejriwal
  2. नकली शिवसेना मतांसाठी बॉम्बस्फोटातील आरोपीला खांद्यावर घेऊन नाचते; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  3. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात 11 वर्षानंतर निकाल, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप - Narendra Dabholkar Case Verdict

Last Updated : May 10, 2024, 6:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.