लातूर Dalit worker beaten : लातूर शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरनं एका दलित कामगाराचं अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसंच कामगाराला दोन दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण करून अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार डाक्टरनं केला आहे.
जातीवाचक शिवगाळ : प्रसाद काकडे (नाव बदलेलं आहे) असं या डॉक्टरचं नाव असून त्यांचं लातूर शहरात रुग्णालय आहे. पीडित शिवराज कांबळे (नाव बदलेलं आहे) यांना लिफ्ट बसवण्याचं काम डॉ. प्रसाद काकडे यांनी दिलं होतं. मात्र, प्रसाद काकडे यांनी नंतर वाद घालत पीडित शिवराज कांबळे यांना दिलेले 19.36 लाख रुपये परत देण्याची मागणी करत कांबळे यांना जातीवाचक शिवगाळ केलीय.
गुंगीचं औषध देत अनैसर्गिक कृत्य : त्यानंतर प्रसाद काकडे यांच्या माणसांनी 26 मार्च रोजी पीडित शिवराज कांबळे यांचं दुपारी दोन वाजता अपहण केलं. पीडित शिवराज कांबळे यांना तब्बल दोन दिवस रेल्वे स्टेशन जवळील एका फार्म हाऊसवर डांबून ठेण्यात आलं. तिथं कांबळे यांना जबर मारहाण करण्यात आली. तसंच त्यांनी गुंगीचं औषध देत त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य केलं. त्यानंतर 28 मार्च रोजी कांबळे यांना लातूर रेल्वे स्थानकावर बेशुद्ध अवस्थेत आणून टाकण्यात आलं.
सहा जणांवर गुन्हा दाखल : शुद्धीवर आल्यानंतर कांबळे यांनी लातूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी प्रसाद काकडे यांच्यासह सहा जणांवर कलम 363,334,324,323,143,147,149,504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम - 3(1) (R), 3(1) (S), 3 (2) (VA) अन्वये गुन्ह्याची नोंद कण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लातूर शहराचे पोलीस उपाधीक्षक भागवत फुंदे करीत आहेत.
हे वाचलंत का :
- तीन दशकं दहशत माजवणाऱ्या गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृतदेह 'सुपुर्द-ए-खाक'; समर्थकांची मोठी गर्दी - Mukhtar Ansari Death
- दादर रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी; फेक कॉल करणारा अटकेत - Dadar Railway Station
- रेस्टॉरंटच्या माजी व्यवस्थापकानं मालकाला धमकी देत 10 लाखांची मागितली खंडणी; गुन्हा दाखल - EXTORTION CASE MUMBAI