ETV Bharat / state

गुलाबी लसूण एक वरदान! कर्व्हालो कुटुंबीयांनी जपलंय दोनशे वर्षांचं गुलाबी लसणाचं वाण - PINK GARLIC FARMING

गुलाबी लसूण उत्पादकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. गुलाबी लसूणची लागवड करून पालघर येथील कर्व्हालो कुटुंब पांढऱ्या लसणाच्या तुलनेत भरघोस नफा कमवत आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2024, 7:03 PM IST

Updated : Nov 29, 2024, 7:28 PM IST

पालघर : अलीकडच्या काळात शेती करणं कठीण झालं आहे. त्यात वसई सारख्या परिसरात तर शेतीऐवजी उद्योग आणि नोकऱ्या करण्याकडे लोकांचा कल आहे. अशा परिस्थितीत वसई तालुक्यातील गिरीज गावातील मारोडेवाडी येथे निकलस कर्व्हालो, त्याचे चिरंजीव अनिल आणि सून हर्षाली यांनी वाडवडीलांची गुलाबी लसणाच्या शेतीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. अवघ्या दोन गुंठ्यांत हे गुलाबी लसणाचे वाण जिवंत ठेवण्यासाठी हे कुटुंब अतोनात कष्ट घेत असून पालघर जिल्ह्यात यांच्या व्यतिरिक्त हे उत्पन्न कुठेही घेतलं जात नाही. त्यामुळं त्यांच्या लसणाचा सुगंध दूरवर दरवळत असून लसूण लागवडी अगोदरच खरेदीचे बुकिंग झालेले असते.

वसई जवळ कर्व्हालो कुटुंबीयांची शेती आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. केळी, कांदा बोकर्ली, वांगी, फ्लावर्स, बनकेळी अशी पिके घेतली जातात. हे कुटुंब बाहेरून फारसं काही खरेदी करत नाही. तेल वगळता अन्य गरजा या त्यांच्या शेतीतून पूर्ण होतात. लाॅकडाउनच्या काळात तर त्यांचं कुटुंब शेतीतील उत्पादनावरच जगत होते. लाॅकडाउनच्या काळात सर्व बंद असल्यानं त्यांना शेतीतील पिकांतून जादा उत्पन्न मिळाले.

गुलाबी लसूणची शेती (Source - ETV Bharat Reporter)

गुलाबी लसणाच्या शेतीत पडला नाही खंड : कर्व्हालो कुटुंब अन्य पिकांच्या साखळीत जरी बदल करीत असले, तरी गुलाबी लसणाची शेती मात्र ते कायम करतात. गुलाबी लसणाची शेती मोठ्या क्षेत्रावर केली जात नाही. वसई पश्चिममधील गिरीज तलावानजीक मारोडे भागात त्यांची ही लसणाची शेती आहे. या परिसरातील जमीन अतिशय कडक असते. परंतु अनिल स्वतःच्या पावर ट्रिलरनं तीन-चारवेळा मशागत करून ती भुसभुशीत करतात, त्यात शेणखत घातलं जातं. कर्व्हालो कुटुंबीयांनी रासायनिक खतांना दूर ठेवलं असून सेंद्रिय खते आणि शेणखतावरच भर दिला आहे.

लसणाची शेती करणं अवघड : लसणाची शेती तितकीशी सोपी नाही. एकेक पाकळी स्वतंत्र करून खणप्यानं अर्धा इंच खोल पाकळी लावावी लागते. दोन पाकळ्यांच्या मध्ये वितभर अंतर ठेवावं लागतं. लसूण रुजायला पंधरा दिवस लागतात. लसूण लावल्यानंतर त्याला योग्य प्रमाणातच पाणी देणं गरजेचं आहे. पाणी जास्त दिलं, तर लसूण सडण्याचा धोका असतो. त्यामुळं पाणी ठराविक अंतरानं द्यावं लागतं. पंधरा दिवसानंतर लसूण पातळ झाला असेल, तर पुन्हा मोकळ्या जागी दुसऱ्यांदा लसणाची लागवड करावी लागते. जमिनीचा पोत बिघडू नये, म्हणून निर्माल्यापासून तयार केलेलं खतच या गुलाबी लसणाच्या शेतीसाठी वापरलं जातं. एरवी दर दहा दिवसांनी पाणी दिलं जातं, तर ऊन वाढल्यानंतर मात्र, आठ दिवसांनी पाणी द्यावं लागतं. नव्वद दिवसात लसून तयार होतो. त्या अगोदर त्यावर करपा पडायला लागला, तर फवारणी करावी लागते. शिवाय दव पडण्याच्या काळात अधिक लक्ष द्यावं लागतं. एकदा लसूण तयार झाला, की ते आपोआप कळते.

गुलाबी लसणाला आयुर्वेदिक महत्त्व : "एकदा लसूण तयार झाला, की ते आपोआप कळते. पात पडायला लागली की, लसून काढणीला आला, असा त्याचा अर्थ होतो. लसणाची शेती करणंही कांद्याइतकं सोपं नसतं, खुडणार नाही अशा पद्धतीनं लसून काढावा लागतो. शेतातच 20-25 दिवस तो सुकून ठेवावा लागतो. नंतर अर्धा-अर्धा किलोचे पॅक तयार करून ते घरातील माळ्यावर ठेवले जातात. या गुलाबी लसणाला आयुर्वेदिक महत्त्व आहे. लसूण आणि गूळ खाल्ल्यानं अनेक व्याधी दूर होतात. कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या, तर रक्त पातळ होतं असं या विषयातील तज्ञ सांगतात. लसूण माळ्यावर ठेवला, की घराबाहेर त्याचा सुगंध जातो. त्यामुळं आमच्याकडे लसूण आहे हे सर्वांना समजतं," असं हर्षाली कर्व्हालो यांनी सांगितलं. दोनशे वर्षापासून आजोबा, पणजोबांनी जपलेलं गुलाबी लसणाचं वाण जपण्यासाठी निकलस, अनिल आणि हर्षाली खूप कष्ट घेतात.

मजूर मिळत नसल्यानं समस्या : कर्व्हालो कुटुंबीयांच्या लसणाची ख्याती दूरवर पसरली असून लसून लागवडीच्या अगोदरच त्यांच्याकडे आगाऊ नोंदणी केली जाते. कधी कधी एक एक वर्ष अगोदर नोंदणी असते. विशेषतः ज्यांच्या घरात लग्न आहे, त्यांच्याकडून तर हमखास गुलाबी लसणाची मागणी येते. अलीकडच्या काळात शेती परवडत नाही. विशेषतः कोकणातील शेती तुकड्या तुकड्याची आहे. त्यामुळं मशागत करता येत नाही, शिवाय मजूर मिळत नाही. अनेक समस्या असतानाही कर्व्हालो कुटुंबीयांनी आपल्याशी मजुरांची एक टोळी कायम जोडून ठेवली असून, या महिलांच्या मदतीनं लसूण लागवड आणि काढणीपर्यंतची सगळी कामं केली जातात. शेती परवडत नाही, त्यामुळं शेती सोडण्याकडे लोकांचा कल वाढला असल्याची खंत निकलस कर्व्हालो यांनी व्यक्त केली आहे.

आपण केवळ आवडीमुळेच हे गुलाबी लसणाचे वाण जतन करण्यासाठी झटत आहोत. माझ्या मुलानं आणि सुनेनं शेती जपली आहे, याचा मला अभिमान आहे. पुढच्या काळात कोणी शेती करील की नाही याबाबत संभ्रम आहे. - निकलस कर्व्हालो, गुलाबी लसून उत्पादक

हेही वाचा

  1. चंद्रपुरात मानव अन् वन्यजीव संघर्ष शिगेला; तीन वर्षांत 98 वाघ-बिबट्यांचा मृत्यू, तर वन्यजीवांच्या हल्ल्यात 145 जणांनी गमावला जीव
  2. कोल्हापुरातील 'या' गावाचा विषयच "लय हार्ड", वाहनांच्या नंबरवरून ओळखली जातात घरं
  3. 'इंद्रायणी भाताचं हब'! संपूर्ण गावच करतंय भाताची शेती, पाहा स्पेशल रिपोर्ट

Last Updated : Nov 29, 2024, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.