ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : उद्योगपती आनंद महिंद्रांनी व्यक्त केलं दु:ख, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी . . . - Ghatkopar Hoarding Collapse - GHATKOPAR HOARDING COLLAPSE

Ghatkopar Hoarding Collapse : मुंबईतील घाटकोपर इथं अनाधिकृत होर्डिंग कोसळून तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दु:ख व्यक्त केलं.

Ghatkopar Hoarding Collapse
उद्योगपती आनंद महिंद्रा (ETV Bharat Marathi)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 2:28 PM IST

मुंबई Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर इथं अनाधिकृत होर्डिंग कोसळून आतापर्यंत तब्बल 14 नागरिकांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. 14 नागरिकांचा मृत्यू झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त केलं. हे कदीही स्विकारण्यासारखं नाही, मुंबई हे शहर महानगरात रुपांतरीत होत आहोत, मात्र अशा घटना अस्वीकार्य आहेत. आपण कठोर नियम पाळले पाहिजेत, अशा भावना उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केल्या आहेत.

Ghatkopar Hoarding Collapse
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेलं ट्विट (ETV Bharat)

आपण कठोर नियम पाळले पाहिजेत : घाटकोपर इथल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून तब्बल 14 नागरिकांचा बळी गेला आहे. घाटकोपर येथील दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईतील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यातून होर्डिंग लावण्याबाबत असलेल्या नियमांचं पालन होत नसल्याचं दिसून येत. त्याचा परिणाम सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. याबाबत असलेल्या 'सक्त नियमांचं पालन झालंच पाहिजे' असं उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सामाजिक विषयांवर त्यांनी अनेकदा आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. आता मुंबईतील या दुर्घटनेबाबत देखील आनंद महिंद्रा यांनी आपलं परखड मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.

अशा घटना अपेक्षित नाहीत : आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला. तर 60 जण जखमी झाले आहेत. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मुंबई एक अत्याधुनिक विकसित शहर म्हणून पुढं येण्याचा प्रयत्न करत आहे. अशात अशा घटना हे अपेक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असले, तरी या संदर्भात असलेल्या नियमांचं सक्तीनं पालन झालंच पाहिजे." असं उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नमूद केलं आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी, "या प्रकरणात जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसानभ रपाई देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत शासन कठोर भूमिका घेणार असून, जिथं बेकायदा होर्डिंग्ज लावले असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल."

हेही वाचा :

  1. "हिंमत नही छोडना, बस्स !" आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना ऑफर केली थार
  2. आनंद महिंद्रांनी केले '12 th फेल'चे कौतुक, विक्रांत मॅसी राष्ट्रीय पुरस्कारास पात्र असल्याचे दिला निर्वाळा
  3. Anand Mahindra tweet : आनंद महिंद्रांकडून 'त्या' वेटरचे कौतूक, म्हणाले हा तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा दावेदार...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.