ETV Bharat / state

ड्रग्ज हे महाराष्ट्राची पिढी नासवण्याचे प्रकरण-उद्धव ठाकरे - Breaking News today

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 7:24 AM IST

Updated : Jun 27, 2024, 1:33 PM IST

Breaking News today
Breaking News today (Source - ETV Bharat Des)

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना गुरुवारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एम्स) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. मोदी सरकारनं त्यांना 30 मार्च 2024 रोजी भारतरत्न देऊन गौरव केला.

'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

1:31 PM, 27 Jun 2024 (IST)

ड्रग्ज हे महाराष्ट्राची पिढी नासवण्याचे प्रकरण

"ड्रग्ज हे महाराष्ट्राची पिढी नासवण्याचे प्रकरण आहे. सरकार सत्तेच्या नशेत आहे. सर्वांना एकत्र येऊन विषय खणून काढा. एवढं ड्रग्ज येते कुठून?" असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

1:15 PM, 27 Jun 2024 (IST)

शेतकऱ्यांप्रती सरकार असंवेदनशील- उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एनडीए आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "घोषणा किती आणि पूर्तता किती झाली, हे सांगावे. राज्यात रोज ९ शेतकरी आत्महत्या करत आहेत. थापा खूप झाल्या आहेत. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. फडणवीस यांनी आधी कर्जमाफी केली, ती कर्जमाफी अजूनही सुरू आहे. शिंदे अमावस्या पौर्णिमेला पंचतारांकित शेती करतात. जनेतला कुणीही वाली राहिले नाही. राज्यात मुलींप्रमाणं मुलांसाठी योजना आणा. बेरोजगारी वाढत आहे. पोलीस भरतीला येणाऱ्या तरुणांचे हाल होत आहेत."

12:52 PM, 27 Jun 2024 (IST)

राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो-प्रवीण दरेकर

राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो. संवाद साधणं हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत. लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकत्र होते. याचा राजकीय अर्थ काढू नये, असेही भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

12:09 PM, 27 Jun 2024 (IST)

राज्यातील जनतेला चॉकलेटच देणार आहात-उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटील यांना टोला

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले. "उद्या तुम्ही राज्यातील जनतेला चॉकलेटच देणार आहात," असा उद्धव ठाकरे यांनी चॉकलेट घेत टोला लगावला. चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा भरवत विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

12:07 PM, 27 Jun 2024 (IST)

दुधाला किमान ३५ रुपये भाव द्या, या मागणीसाठी २८ जूनपासून राज्यभर आंदोलन - संघर्ष समिती

दुधाला किमान ३५ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी राज्यभर दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. सरकारनं या सर्व आंदोलनांची दखल घेत, दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं सरकारला केले. दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २८ जूनपासून राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे.

11:47 AM, 27 Jun 2024 (IST)

नीटमध्ये घोटाळे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार-राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नीटमधील पेपर फुटीचा अभिभाषणात उल्लेख केला. चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रपतींनी अभिभाषणात दिली

11:31 AM, 27 Jun 2024 (IST)

शोक प्रस्तावानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

लोकसभेचे खासदार म्हणून निवडून दिलेल्या आमदारांनी दिलेले राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात घोषित केले. यामध्ये निलेश लंके, राजू पारवे, वर्षा गायकवाड ,रवींद्र वायकर, प्रतिभा धानोरकर, संदिपान भुमरे, बळवंत वानखडे यांचा समावेश आहे. विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून आमदार संजय शिरसाट कालिदास कोळंबकर अमिन पटेल आणि किरण लहामटे यांची नियुक्ती कतरण्यात आली. शोक प्रस्तावानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

10:54 AM, 27 Jun 2024 (IST)

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी रुग्णवाहिका नाही, गर्भवती महिलेला झोळीतून नेण्याची वेळ-रोहित पवार

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार रोहित पवार यांनी आरोग्य सुविधांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " सामान्यांचं सरकार अशी जाहिरातबाजी करणाऱ्या या सरकारच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगणारा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आहे. येथील आमदार भाजपाचे असून केंद्रात पाच वर्षे केंद्रात मंत्री होते. दलाली करणाऱ्या मंत्र्याला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी ॲम्बुलन्सही देता येऊ नये? त्यामुळंच प्रसूतीकळा आलेल्या गर्भवती महिलेला असं झोळीतून न्यावं लागलं. मुख्यमंत्री महोदय सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना या सरकारला कळणारच नाही का? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.

10:46 AM, 27 Jun 2024 (IST)

"महायुतीचे मंत्री सुखी, शेतकरी मात्र दु:खी," विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, असे फलक आमदारांनी हाती घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. "महायुतीचे मंत्री सुखी, शेतकरी मात्र दु:खी," अशा विरोधकांनी घोषणा दिल्या आहेत.

10:43 AM, 27 Jun 2024 (IST)

पुण्यात झिकाचा आढळला तिसरा रुग्ण

पुणे शहरात झिका व्हायरसचा अजून एक रुग्ण आढळला आहे. पुणे शहरात झिका व्हायरसचे एकूण तीन रुग्ण आढळले आहेत. नोबेल हॉस्पिटलमध्ये एकाला झिकाची लागण झाली आहे. पुणे महापालिकेकडून नोबेल हॉस्पिटलला नोटीस देण्यात आली आहे. झिकाची लागण झालेला रुग्ण असल्याचं महापालिकेला कळवलेलं नाही. त्यामुळे नोबेल हॉस्पिटलला नोटीस पाठविली आहे. दोन एरंडवणे आणि एक हडपसर भागातील रुग्ण आहे.

9:49 AM, 27 Jun 2024 (IST)

"खोटेपणाची चीड असेल तर फडणवीस यांनी मोदींचा पर्दाफाश करावा"-संजय राऊत

"खोटेपणाची चीड आहे, तर फडणवीस यांनी मोदींचा पर्दाफाश करावा," असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यावर खासदार राऊत म्हणाले, "इंदिरा गांधींच्या नखाचीही सर या सरकारला नाही." "मुख्यमंत्री पदावरून विधाने नकोत," असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले. त्यावर राऊत म्हणाले, " मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणं धोक्याचं आहे."

9:06 AM, 27 Jun 2024 (IST)

रिवॉल्व्हर दाखवून बिल्डरनं दिली धमकी, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तपास सुरू

बिल्डरनं दिवसाढवळ्या ऑफिसमध्ये शेतकऱ्याला रिवॉल्व्हर दाखवून धमकी दिली आहे. विश्रांतवाडीतील हा प्रकार सोशल मीडियात व्हायरल झाला. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे

8:35 AM, 27 Jun 2024 (IST)

मुख्यमंत्री कोण होणार, यावर विधाने टाळली पाहिजेत-जयंत पाटील

"महाविकास आघाडी सत्तेत आली पाहिजे. मुख्यमंत्री कोण होणार, यावर विधाने टाळली पाहिजेत," अशी अपेक्षा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

7:51 AM, 27 Jun 2024 (IST)

एथर एनर्जी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करणार इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीचा कारखाना

एथर एनर्जी ही इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत (AURIC) उत्पादन प्रकल्प सुरू असणार आहे. या प्रकल्पामधून वर्षाला १० लाख स्कूटर आणि बॅटरी पॅकचे उत्पादन घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ही गुंतवणूक 2 हजार कोटींपेक्षा अधिकची आहे. यामुळे जवळपास 4000 युवकांना रोजगारची संधी उपलब्ध होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. येत्या काळात मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासाचे नक्कीच नेतृत्त्व करेल, हा विश्वास असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले.

7:36 AM, 27 Jun 2024 (IST)

मुंबईमधील तरुणीचा गुरुग्राममधील तरुणीबरोबर विवाह

अंजू आणि कविता दोन तरुणीचा नुकतेच गुरुग्राममध्ये पारंपारिक पद्धतीनं लग्न केले. त्या दोघीही समलैंगिक असल्यानं त्यांच लग्न भारतात कायदेशीर नाही. मात्र, त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपरचे प्रमाणपत्र मिळू शकते. याबाबत अंजू यांनी सांगितलं, " मी कविताला मेकअप आर्टिस्ट म्हणून गुरुग्राममध्ये बोलाविल्यानंतर ती जवळपास २२ दिवस येथे राहिली. ती माझ्यमा आईलादेखील आवडली. आम्ही ४ वर्षांपासून एकत्र राहत आहोत."

Last Updated : Jun 27, 2024, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.