ETV Bharat / state

प्रेयसीचा खून केल्यानंतर दिला स्पर्धा परीक्षेचा पेपर; आनंदवन येथील हत्याकांडात आरोपीचा खुलासा - Girlfriend Murder Case Chandrapur - GIRLFRIEND MURDER CASE CHANDRAPUR

Girlfriend Murder Case Chandrapur : कुष्ठरुग्णांसाठी नंदनवन समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथील आनंदवन येथे एका तरुणीचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. यात प्रियकरानेच तिचा खून केला; मात्र आरोपी प्रियकराने तिचा खून केल्यानंतर चक्क परीक्षेचा पेपर दिल्याचं तपासात समोर आलं आहे.

Girlfriend Murder Case Chandrapur
फाईल फोटो (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 8:14 PM IST

चंद्रपूर Girlfriend Murder Case Chandrapur : प्रियकराने खून केलेली तरुणी घटस्फोट झाल्यावर आपल्या आई-वडिलांच्या घरी आनंदवन येथे राहात होती. तिचे वडील-आई हे दोघेही दिव्यांग आहेत. आरोपी हा मूळचा जळगावचा; मात्र त्याला कुष्ठरोग असल्याने एक वर्षापूर्वी तो आनंदवन येथे उपचारासाठी आला होता. सोबत तो रुग्णालयात काम देखील करायचा. याच दरम्यान त्याची ओळख तरुणीच्या वडिलांसोबत झाली. यानंतर आरोपीचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. त्यात आरोपी आणि तरुणीचे सूत जुळले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका देखील घेतल्या; मात्र यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.

ती घरी एकटीच अन् त्याने केला खून : यानंतर तरुणीचे गोंदिया येथील एका युवकाशी प्रेमसंबंध जुळले. ती आरोपीला टाळू लागली. त्यांच्यात वाद व्हायला लागले. अशातच आरोपीने तरुणीचा खून करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीन महिन्यांपूर्वी त्याने चाकूची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. या दरम्यान तो सूड घेण्याची वाट बघत होता. बुधवारी 26 जूनला तरुणीचे आई-वडील हे उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. ती एकटीच घरी होती. हीच संधी साधत तो तिच्या घरी गेला आणि तिचा खून केला. दुपारी तिचे वडील यांनी तिला अनेकदा फोन केले; मात्र तिचा फोन हा बंद होता. रात्री ते आले असता बाथरूममध्ये मुलगी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून होती.

24 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या : याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपास केला; मात्र शस्त्र आढळून आले नाही. आनंदवन सारख्या ठिकाणी अशी घडलेली पहिलीच घटना होती. चौकशी केली असताना तिच्या मैत्रिणीने आरोपी तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानुसार वरोरा पोलिसांनी आरोपीच्या हालचालीवर नजर ठेवली आणि संशय येताच लगेच त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असताना त्याने ह्या खुनाची कबुली दिली. 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली.

खून केल्यानंतर दिला स्पर्धा परीक्षेचा पेपर : या तपासात धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे तरुणीचा खून केल्यानंतर त्याने त्याच दिवशी स्पर्धा परीक्षेचा पेपर देखील दिला होता. एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांसह तो नागपूर जवळील अशोकवन येथेही गेला होता. याची कबुली आरोपीने तपासात दिली आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

आरोपीचा मोबाईल जप्त केला : पोलिसांचा तपास सुरू असून यात चाकू आणि आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. खून केल्याच्या दिवशी त्याने पेपर दिल्याची बाब समोर आली आहे, अशी माहिती वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल कचारे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. मुंबई-नाशिक महामार्गावर खड्यांचं साम्राज: वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच - Traffic on Mumbai Nashik highway
  2. पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास गय करणार नाही - धनंजय मुंडे - Dhananjay Munde
  3. राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असते तर...; काय म्हणाले संजय राऊत? - Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.