ETV Bharat / state

लग्न ठरलं एकासोबत अन् पळून गेली दुसऱ्यासोबत; मुंबई उच्च न्यायालयानं दिला 'हा' निर्णय - Girl Marriage Court Decision - GIRL MARRIAGE COURT DECISION

Girl Marriage Court Decision : आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलासोबत साखरपुडा करुन लग्नाची तारीख निश्चित केल्यानंतर वधू आपल्या पसंतीच्या मुलासोबत पळून गेली. वराची व कुटुंबियांची फसवणूक केल्याप्रकरणी मुलगी तिचे आई-वडील आणि भावाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Girl Marriage Court Decision
Girl Marriage Court Decision (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 10:20 PM IST

Updated : Aug 28, 2024, 10:26 PM IST

मुंबई Girl Marriage Court Decision : आई-वडिलांनी ठरवून दिलेल्या मुलासोबत लग्नाची तारीख ठरवून वधू आपल्या पसंतीच्या मुलासोबत पळून गेल्याची घटना समोर आली होती. यानंतर ज्या मुलासोबत हे लग्न ठरलं होतं, त्या मुलाच्या कुटुंबियांनी मुलगी, तिचे आई-वडील आणि भावाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा रद्द करण्याचा निर्णय : गुन्हा रद्द करण्यासाठी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठानं या प्रकरणात मुलगी आणि तिच्या कुटुंबियांचा फसवण्याचा कोणताही हेतू नसल्याचा, निकाल देत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय दिलाय.

काय प्रकरण आहे? : मुलीचा 27 मार्च 2022 रोजी साखरपुडा झाला. 1 मे 2022 ही लग्नाची तारीख ठरली. या लग्नासाठी मुलानं दीड लाखांहून अधिक खर्च केला होता. मात्र, 28 एप्रिल रोजी मुलीच्या कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तर दुसरीकडं मुलगा व त्याच्या कुटुंबियांनी आपली फसवणूक करून मुलगी दुसऱ्या मुलासोबत पळून गेल्याची तक्रार दिली.

मुलीच्या कुटुंबियांचा फसवण्याचा हेतू नव्हता : या प्रकरणात मुलगी व तिच्या कुटुंबियांचा फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता. फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सुरुवातीपासून फसवणूक करण्याचा हेतू असावा लागतो. मात्र, या प्रकरणात फसवणुकीच्या कोणत्याही बाबी दिसत नसल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं. या प्रकरणी मुलीतर्फे वकील प्रिया गजरे, अमित कर्वे यांनी तर मुलातर्फे वकील धनंजय भोसले यांनी काम पाहिलं.

गुन्हा रद्द : या प्रकरणी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांच्याविरुद्ध कलम 417, 418, 420, 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कलम 420 अंतर्गत याचिकाकर्त्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही, असं खंडपीठानं म्हटलं. या प्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या कलमांपैकी कलम 417, 418, 500 नुसार कारवाई करण्यास न्यायालयानं परवानगी दिली. ही सर्व कलमं अदखलपात्र गुन्ह्यांशी संबंधित आहेत.

हेही वाचा

  1. "लग्न केलं नाहीस तर घरच्यांना सोडणार नाही"; तरुणाच्या जाचाला कंटाळून 15 वर्षीय मुलीनं संपवलं जीवन, दहा जणांवर गुन्हा दाखल - Minor Girl Suicide Nashik
  2. पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, हातपाय कापून धड फेकलं नदीपात्रात, नागरिक हादरले - Found Girls Body Parts In Pune
  3. म्हाडा इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 2 कामगारांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी - Wall Collapse In Mumbai

Last Updated : Aug 28, 2024, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.