ETV Bharat / state

बॉलिवूडच्या भाईजानची पाचावर धारण; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानची उडाली झोप, झिशान सिद्दिकींनी दिली 'ही' माहिती - ACTOR SALMAN KHAN SLEEPLESS

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा केला. त्यानंतर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला नीट झोप लागली नसल्याचा खुलासा झिशान सिद्दीकींनी केला.

Actor Salman Khan Sleepless
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 9:44 AM IST

Updated : Oct 29, 2024, 1:38 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्यानंतर हॉलीवूडमध्ये प्रचंड शांतता पसरली असल्याचं बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी आणि बॉलीवूड यांचे संबंध हे सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलीवूडच्या भाईजानची पाचावर धारण बसल्याचं दिसून येत आहे. याबाबतचा खुलासा खुद्द बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. भाईजानची अवस्था स्थिर नसल्याचं आमदार झिशान सिद्दीकी यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना सांगितलं आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याला रात्री नीट झोप लागली नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची सलमान खानशी खास मैत्री होती. त्यांच्या मैत्रीचे किस्से आजही चर्चेचा विषय आहे. सलमानचे शाहरुख खानसोबतचे सबंध बिघडले, तेव्हा बाबा सिद्दीकी यांनीच या दोघांमध्ये मध्यस्थी करुन वाद मिटवला होता, असं म्हटलं जाते.

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर भाईजानला होत आहे त्रास : आमदार झिशान सिद्दीकी यांनी सोमवारी एका माध्यम संस्थेला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्याबाबत भाष्य केलं आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे, की "जेव्हापासून वडिलांचे निधन झालं तेव्हापासून सलमान खान सतत कुटुंबाच्या संपर्कात असतो. दररोज रात्री कुटुंबीयांना फोन करतो. सलमान खाननं फोन करुन बाबांच्या मृत्यूनंतर त्रास होत आहे," असं देखील सांगितलं. झिशान यांनी सांगितलं की, "सिद्दीकी कुटुंबाला केवळ सलमानच नाही तर बॉलीवूडमधील इतर अभिनेते आणि अभिनेत्रींनी देखील आधार दिला," असंही झिशान सिद्दिकी यांनी सांगितलं आहे. यामध्ये संजय दत्त आणि शिल्पा शेट्टी यांच्या नावाचाही समावेश आहे.

सलमान खानला रात्री नीट झोप लागली नाही : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं देखील शोक व्यक्त केल्याचं आमदार सिद्दीकी यांनी सांगितलं आहे. झिशान यांच्या म्हणण्यानुसार, "फिल्म इंडस्ट्रीतून मला भेटायला येणारे सर्व लोक केवळ मित्रच नाहीत, तर ते सिद्दीकी कुटुंबाचा एक भाग आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमान खान दुःखी आहे. बाबा आणि सलमान भाई खूप जवळचे मित्र होते. दोघंही सख्ख्या भावांसारखे जवळचे होते. वडिलांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबाला सलमान खानकडून खूप पाठिंबा मिळाला आहे. तो मला नेहमी फोन करत असतो. तो रोज रात्री माझ्याशी बोलतो. या घटनेनंतर सलमान खानला देखील रात्री नीट झोप लागली नाही," अशी प्रतिक्रिया आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खानला मिळाली नवी धमकी, केली 5 कोटींची मागणी
  2. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मीका सिंगनं दिला सलमान खानला पाठिंबा, यूजर्स चिंतेत
  3. सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईमध्ये मांडवली करण्यासाठी पुढं आली सोमी अली, पाहा पोस्ट

Last Updated : Oct 29, 2024, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.