ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक 2024 : मतदान जागृतीसाठी आता निवडणूक आयोग घेणार अंगणवाडी सेविकांचा आधार - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. मात्र मागील लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला होता. त्यामुळे मुंबई महापालिका आणि निवडणूक आयोग मतदार जनजागृती मोहीम राबवत आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात येणार आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 2:32 PM IST

Lok Sabha Election 2024
संग्रहित छायाचित्र

मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 मे रोजी मुंबई परिसरातील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला होता. त्यामुळे यंदा दहा हजार अंगणवाडी सेविकांमार्फत मतदान जागृती करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे.

निवडणूक आयोग, मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृती मोहीम : लोकसभा निवडणुकीचा सार्वजनिक उत्सव मोठ्या धामधुमीत सुरू झाला आहे. मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असताना याकडे अनेक मतदार पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. या मतदारांना जागृत करण्यासाठी आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आता निवडणूक आयोग आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडावे आणि मतदान करावे यासाठी घरोघरी जाऊन आवाहन करण्यात येणार आहे.

2019 च्या निवडणुकीतील स्थिती? : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील लोकसभा मतदार संघामध्ये सरासरी झालेलं मतदान हे 50 टक्क्यांपेक्षा कमी होतं. देशपातळीवर मतदान 67 टक्के झालं होतं. राज्यात 61 टक्के मतदान झालं होतं. मतदानाच्या दिवशी असलेली सार्वत्रिक सुट्टी पाहता अनेक लोक हे फिरायला जाणं पसंत करतात. तर उच्चभ्रू वस्तीतील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसत नाहीत. मुंबईतील झोपडपट्टी बहुल मतदार संघांमध्ये मात्र मतदान बऱ्यापैकी झाल्याचं चित्र असते. त्यामुळे मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडावं, यासाठी आता विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आता अंगणवाडी सेविकांची आणि मदतनिसांची मदत घेतली जाणार असल्याचं निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी आणि महानगरपालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांनी सांगितलं.

अंगणवाडी सेविकांची घेणार मदत : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मदत घेतली जाणार आहे. मुंबईमध्ये 5221 अंगणवाड्या आहेत. यामध्ये मुंबई शहरातील 940 आणि उपनगरातील 4281 अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा मिळून 10 हजार 442 कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृतीचं काम केलं जाणार आहे. या महिला मुंबईतील प्रत्येक घराशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्याविषयी आवाहन करणार आहेत.

अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण : "मतदारांशी संपर्क साधताना आपलं डोके शांत ठेवून कसा संवाद साधला पाहिजे, मतदारांशी संपर्क साधताना कसं संवाद कौशल्य वापरलं पाहिजे. नव मतदारांना मतदानाला जाताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी केली पाहिजे. तसेच ज्येष्ठ मतदारांशी बोलताना त्यांना कशाप्रकारे समजावून सांगायचं, याचं प्रशिक्षण या अंगणवाडी सेविकांना देण्यात येत आहे," असं महापालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांनी सांगितलं. तर "मुंबईतील झोपडपट्ट्या आणि उच्चभ्रू वस्ती अशा दोन्ही ठिकाणी या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जाणार आहेत. मुख्यत्वे शहरी आणि उपनगर भागातील झोपडपट्टी विभागात या अंगणवाडी सेविका जाऊन मतदानाचं आवाहन करणार आहेत," असं निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितलं. "या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस घरोघरी संपर्क साधून घटनेनं प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकार सन्मानानं बजावला पाहिजे याविषयी आवाहन करतील," असंही सूर्यवंशी म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. उमेदवारी अर्ज भरायला निघालेल्या नवनीत राणांना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द - Navneet Rana
  2. खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला महायुतीमधून विरोध, शिंदे गट उमेदवार बदलणार? - Lok Sabha election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.