ETV Bharat / state

देशाच्या आर्थिक राजधानीचा तब्बल 60 हजार कोटींचा अर्थसंकल्प, निवडणुकाच न झाल्यानं यावर्षी देखील नगरसेवकांची अनुपस्थिती - 60 हजार कोटींचा अर्थसंकल्प

BMC Budget : मुंबई महानगरपालिकेने 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी अर्थसंकल्प सादर केला. (Administrator Iqbal Singh Chahal) यावर्षी पालिकेने तब्बल ५९ हजार ९५४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षी देखील नगरसेवकांच्या अनुपस्थितीत पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

BMC Budget
इक्बाल सिंग चहल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 7:43 PM IST

मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पाविषयी बोलताना प्रशासक इक्बाल सिंग चहल

मुंबई BMC Budget : मुंबई महा पालिकेचा हा अर्थसंकल्प काही राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. पालिकेचा मागील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 52 हजार कोटी रुपये इतका होता. (BMC Financial Year) या वर्षी त्यात 10.50 टक्के वाढ करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 100 कोटी रुपये, पर्यावरण आणि वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी 178 कोटी रुपये आणि मुंबई शहरात 2000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याची तरतूद आहे.

कोस्टल रोडसाठी 2900 कोटी रुपयांची तरतूद : अर्थसंकल्पात झिरो प्रिस्क्रिप्शन धोरणांतर्गत ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याद्वारे मुंबईकरांना मोफत आणि जेनेरिक औषधे दिली जाणार आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षांत अपेक्षित महसूल उत्पन्न 35749.03 कोटी रुपये आहे. जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2459 कोटी रुपये अधिक आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात अपेक्षित महसूल खर्च 28121.94 कोटी रुपये असेल. मुंबईच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात 45759.21 कोटी रुपयांची तरतूद असून, कोस्टल रोडसाठी 2900 कोटी रुपयांची तरतूद आहे.

अर्थसंकल्पात काय विशेष?
1. या वर्षी मालमत्ता करात 1500 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. मागील वर्षी हा निधी 6000 कोटी रुपये इतका होता.
2. महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी "स्वतंत्र शुल्क रचना" लागू केली जाईल. बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी पालिका रुग्णालयात सर्व सोयीसुविधा आहेत. मात्र, यंदा बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र रचना तयार करून त्यावर अभ्यास केला जाणार आहे. एकूण तीन स्वतंत्र रचना असतील. एक महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांसाठी, दुसरी मुंबईबाहेरील रुग्णांसाठी आणि तिसरी मुंबईतील रुग्णांसाठी.
3. बेस्टच्या विकासासाठी 928.65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी 2000 इलेक्ट्रिक बसेस मुंबई शहरात आणल्या जाणार आहेत.
4. मुंबई कोस्टल रोडसाठी यंदा 2900 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. तर, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1870 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
5. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ट्रॅफिक साइनेज, स्क्रॅपयार्ड, पार्किंग ॲप आणि पार्किंग इन्फ्रा, एरिया ट्रॅफिक कंट्रोल यासाठी एकूण 3200 कोटी रुपये तरतूद केले आहेत.
6. वर्सोवा ते दहिसर मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी 2960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
7. बीएमसी रुग्णालये, दवाखाने, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने आणि इतर अनेक आरोग्य सुविधांमध्ये चांगल्या सुविधांसाठी यंदा १७१६.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
8. घनकचरा व्यवस्थापनासाठी यंदा 168 कोटींचा अर्थसंकल्प निर्धारित करण्यात आला आहे.
9. महानगर गॅस लिमिटेडसोबत पालिकेने MOU वर स्वाक्षरी केली आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये बायो सीएनजी प्लांट उभारण्यात येणार असून कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 230 कोटी रुपये अर्थसंकल्पात मांडण्यात आले आहेत.
10. पर्यावरण आणि वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अर्थसंकल्पात 178 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
11. वीरमाता जिजाबाई वनस्पती आणि प्राणिसंग्रहालयात यंदा मगरी आणि गोरिला आणण्यात येणार आहेत. या थीमवर आधारित उद्यानही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी त्यासाठी 74 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
12. मुंबई अग्निशमन दलासाठी यावर्षी फायर ड्रोन खरेदी केले जातील. रोबोटिक लाईफसेव्हिंग बॉयज खरेदी केले जातील. यासाठी 235 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
13. महिला सुरक्षा अभियानांतर्गत अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
14. मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्पासाठी यावर्षी 5045 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
15. पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सोबत घेऊन महानगरपालिका महिलांच्या सुरक्षेसाठी एक स्वतंत्र अप्लिकेशन बनवणार आहे. ज्याद्वारे महिलांना तात्काळ मदत मिळेल आणि महिला अत्याचाराचे प्रमाण देखील कमी होईल.
16. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी त्यांना शिलाई मशीन देणे, कौशल्य शिबिर घेऊन त्यांना प्रशिक्षण देणे. यासोबतच इतर कौशल्य प्रशिक्षण देणे हा पालिकेचा निर्धार आहे.

हेही वाचा:

  1. मराठा मोर्चा म्हणजे कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे- राज ठाकरे
  2. महाविकास आघाडीतील मतं फोडण्याचा भाजपाचा पुन्हा प्रयत्न, राज्यसभा निवडणुकीत भाजपा देणार चौथा उमेदवार?
  3. 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम ॲप काम करेल की नाही? सीईओ विजय शेखर शर्मा यांनी दूर केला संभ्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.