ETV Bharat / state

आरक्षणावरुन शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न हास्यास्पद, राष्ट्रवादीचा पलटवार, तर विरोधकांचा हल्लाबोल - Maratha Reservation Quota - MARATHA RESERVATION QUOTA

Maratha Reservation Quota : मराठा आरक्षणावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपा नेत्यांनी शरद पवार यांनी आरक्षणावरुन आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. शरद पवार यांच्यावर सत्ताधारी टीका करत असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंही भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला.

Maratha Reservation Quota
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 7:04 AM IST

मुंबई Maratha Reservation Quota : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला कधीही आरक्षण मिळावे, अशी भूमिका घेतली नाही. मराठा आरक्षण प्रकरणी शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टीका केली. त्यामुळे शरद पवार यांची मराठा आरक्षणावरुन कोंडी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. मात्र "शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवला नाही, तो 1995 नंतर उद्भवला. त्यामुळे शरद पवारांचा याच्यामध्ये काहीही संबंध नाही. त्यांची कोंडी करणं हास्यास्पद असून जातवार जनगणना करण्याची आमची मागणी ठाम आहे," अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं स्पष्ट केली.

शरद पवारांना घेरण्याचा प्रयत्न : मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर बोलताना शरद पवार यांनी "दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सरकारनं आणि मंत्र्यांनी एका वेळेस भेटणं आवश्यक आहे. दोन्ही समाजाच्या लोकांना वेगवेगळं भेटून हा प्रश्न सुटणार नाही," अशी भूमिका घेतली. शरद पवारांच्या या भूमिकेनंतर महायुतीनं शरद पवारांना आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान देत त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला.

शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी - केशव उपाध्ये : या संदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, "शरद पवारांनी आजपर्यंत कधीही मराठा किंवा ओबीसी आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यांनी कधीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं की नाही, याबाबत स्पष्ट केलेलं नाही. शरद पवार यांनी आधी याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, मगच या विषयावर बोलावं. शरद पवार अनेक वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि केंद्रातही मंत्री होते. मात्र त्यांनी कधीही आरक्षणाच्या बाबत ठोस भूमिका घेऊन तो प्रश्न मार्गी लावावा, यासाठी प्रयत्न केला नाही," असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न - प्रविण दरेकर : भाजपा नेते आणि विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, "हा विरोधी पक्षाचा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न आहे. कारण पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये चांगली होत असल्याचं दिसते. पुन्हा महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता म्हणून पाहायला लागली आहे. त्यामुळे त्यांना खलनायक बनवण्याचा जो काही अजेंडा आहे, तो यशस्वी होत नाही, असं दिसते. आरक्षणाच्या बाबतीत असेल इतर विषयात बाबतीत असेल, आज लोकांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी जे काही खोटी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न होता, तो धुवून निघालाय. मग आपला अजेंडा यशस्वी होत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा देवेंद्र फडणवीस खलनायक कसे आहेत, असं केविलवानं चित्र उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, आपलं फेक नरेटीव्ह, आपला अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न आता लोक हाणून पाडतील.

शरद पवारांवर टीका करणं हास्यास्पद - विकास लवांडे : "शरद पवार यांना आरक्षणावरून घेरण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे, तो अत्यंत हास्यास्पद आहे. यामधून त्यांची हतबलता समोर येत आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर जातीय तेढ निर्माण करण्याचं काम मंत्र्यांनीच केलेलं आहे," असा आरोप लवांडे यांनी केला. वाद लावण्याचं काम मंत्री करत असून त्याचा फटका त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत बसला. त्यामुळे आता आगामी विधानसभेत मराठा समाज आणि ओबीसी समाज आपल्यापासून दूर जाऊ नये, म्हणून कोणाला तरी टार्गेट करायचं म्हणून शरद पवारांना ते टार्गेट करतात. मराठा आरक्षणाची मागणी सुद्धा 2009 नंतर प्रकर्षानं सुरू झालेली आहे. विविध मराठा संघटना 2009 नंतर एकत्र आलेल्या आहेत. शरद पवार हे 95 च्या नंतर कधीही मुख्यमंत्रीनव्हते. उलट शरद पवारांनी राज्यामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर ओबीसीमध्ये जे काय 248 जाती होत्या त्या सर्वांना त्याच्यामध्ये आरक्षण मिळालं. उलट कुणबी प्रमाणपत्र ज्यांना सिद्ध करता आलं, पुरावे देता आले, त्या मराठा समाजातील नागरिकांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. जरांगे राजकीय भूमिका मांडाल तर खबरदार; आशिष शेलार यांचा थेट इशारा - Ashish Shelar On Jarange Patil
  2. दरेकर जरांगेंचा कलगी तुरा; जरांगे म्हणतात, 'कपाळावर कुंकू लावले तर ते...', तर दरेकर म्हणतात 'जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही' - Manoj Jarange Patil
  3. "मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटलांच्या मनात..."; मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन - Deepak Kesarkar on Manoj Jarange

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.