ETV Bharat / state

'अब की बार, 400 पार'चा नारा पूर्ण होणारच, भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास - MP Dhananjay Mahadik Claims

MP Dhananjay Mahadik Claims : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष भोपळाही फोडणार नाही; मात्र भाजपा 'अब की बार, 400 पार'चा नारा पूर्ण करेल, असं मत भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलंय. कोल्हापुरात त्यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनेल असाही दावा केलाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 9:09 PM IST

MP Dhananjay Mahadik Claims
भाजपा खासदार धनंजय महाडिक (Reporter)

कोल्हापूर MP Dhananjay Mahadik Claims : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला 'अब की बार, 400 पार'चा नारा पूर्ण होणारच. यासाठी कोणत्याही भविष्य सांगणाऱ्याची गरज नाही. राज्यासह देशात काँग्रेस भोपळाही फोडणार नाही, असा दावा भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला. कोल्हापुरात महाडिक 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.

कॉंग्रेसचा खासदार निवडून येणार नाही : महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा खासदार धनंजय महाडिक यांनी सांभाळली होती. गेली दीड महिना प्रचार केल्यानंतर आजच्या मतदानाची आपण वाटच पाहत होतो, अशी प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे फक्त दोन खासदार निवडून आले होते. त्यातील राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता भाजपा बरोबर आहेत. त्यामुळे अजूनही काँग्रेस राज्यासह देशात भोपळासुद्धा सोडणार नाही, असा दावा खासदार महाडिक यांनी यावेळी केला. काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून येईल, असं चित्र कोणत्याही मतदारसंघात दिसत नसल्याचं यावेळी खासदार महाडिक म्हणाले.

यासाठी ज्योतिषाची गरज नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत "अबकी बार, 400 पार"चा नारा दिला आहे. हा नारा भाजपाच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टामुळे पूर्ण होणार आहे. यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही, असं सांगून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वासही यावेळी खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.

महाडिकांनी सहकुटुंबानं केलं मतदान : रुईकर कॉलनीतील मतदान केंद्रावर खासदार धनंजय महाडिक, अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, वैष्णवी महाडिक यांनी एकत्रित येऊन मतदान केलं. महाडिक यांच्या घरी लग्नकार्य असतानाही खासदार महाडिक प्रचारात सक्रिय राहिले आणि आज सहकुटुंब येऊन त्यांनी मतदान केलं. यावेळी भाजपाच्या विजयाचा विश्वास महाडिक कुटुंबानं व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावात 16 टक्केच पाणी! 'या' तारखेपर्यंत पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन - Water Shortage In Mumbai
  2. विजय वडेट्टीवार पाकिस्तानात...?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल, ठाकरेंवरही हल्लाबोल - Devendra Fadnavis
  3. मेळघाटात 'वॉटर ॲप्पल', अंदमान निकोबार बेटावरचे फळ बहरले विदर्भात - water apple in melghat

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.