मुंबई Nitesh Rane On Anti Conversion Law : महाराष्ट्रात लव्ह जिहादची आणि धर्मांतराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी शनिवारी केला. या प्रकरणी आम्ही सगळे हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. यावेळी त्यांना उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लागू केलेला धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी त्यांच्याकडं करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
#WATCH | On UP government's anti-conversion law, BJP leader Nitesh Rane says, " we will soon meet the cm (eknath shinde) and deputy cm devendra fadnavis, and urge them to bring an anti-conversion law in maharashtra..." (03.08) pic.twitter.com/CxSn7bZwFj
— ANI (@ANI) August 4, 2024
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणावा : राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सगळे हिंदुत्ववादी नेते मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. यावेळी त्यांना राज्यात उत्तरप्रदेश सरकारप्रमाणं लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. उत्तरप्रदेश सरकारप्रमाणं धर्मांतर विरोधी कायदा करावा, यासाठी लवकरचं आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
ठाण्यात मुलीचं धर्मांतर, आईनं फोडला टाहो : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प 4 मधील समता नगरातील बारावीतील एका तरुणीचं धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. ही तरुणी शेजारच्या मुलांना ट्युशन शिकवण्यासाठी जात होती. यावेळी तिला नवरात्रीचा उपवास सोडण्यास बोलावलं. तेव्हा तरुणीनं प्रसाद खाण्यास नकार दिल्यान ही घटना उघडकीस आली. त्यानंतर या तरुणीनं घर सोडून तिला गायब केल्यानंतर तिचं धर्मांतर केल्याचं उघड झालं. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीचं धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. त्यातच आता राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा आणावा अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा :