मुंबई Nitesh Rane On Manoj Jarange : "मनोज जरांगे यांचं आंदोलन हे फक्त देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी आहे की, मराठा आरक्षणासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित करत आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. जरांगे पाटील यांनी हा आरक्षणाचा लढा कशासाठी सुरू केला? आज मनोज जरांगे पाटील जी स्क्रिप्ट वाचत आहेत, ती नेमकी कुणाची आहे? कारण या स्क्रिप्टमधून आम्हाला "तुतारी''चा वास येत आहे असं म्हणत राणे यांनी अप्रत्यक्ष पवारांकडं रोख असल्याचं यामधून दाखवून दिलं आहे. जर हा लढा खरोखरच मराठा समाजाचा होता तर तो आपण मराठा समाजापर्यंत मर्यादीत ठेवायाला हवा होता. मात्र, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप करून राजकारण केलं ते खालच्या पातळीवरील आहे. तसंच, मी त्यांना सांगेन की सागर बंगल्याची भिंतही त्यांना कधी ओलांडता येणार नाही," असंही राणे म्हणालेत.
आम्ही सुद्धा मराठेच आहोत : "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलेलं आहे. त्यासाठी मराठा समाजानेही फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. यापुढेही जर मनोज जरांगे पाटील यांचं याबाबत समाधान होत नसेल म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतील, तर आम्ही सुद्धा मराठेच आहोत. त्यांना तोंड देण्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं," असंही राणे यावेळी म्हणालेत.
भारत माता की जय म्हणावेच लागेल : भाजपाचा एक नेता टिंगू असून त्यांना बाजूला उभं केलं, तर माझ्या पायजम्याची उंचीसुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त असेल अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "ज्याच्या नावामध्येच जलील आहे, त्याला अजून आपण किती जलील करायचं? हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे. हिंदू समाजाच्या हातातच तुमचा नाडा आहे. म्हणून ज्या दिवशी समाज तुमचा नाडा खेचेल त्यादिवशी तुम्ही पायजामासुध्दा घालायच्या लायकीचे राहणार नाहीत," असा पलटवार त्यांनी केला आहे.
हेही वाचा :
1 मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा : विजय वडेट्टीवार
2 'आंदोलन संपवण्यासाठी मला मारण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
3 देवेंद्र फडणवीसांवर बिनबुडाचे आरोप करू नयेत, अन्यथा आम्ही सामना करण्यास समर्थ : आशिष शेलार