मुंबई Nitesh Rane on Sanjay Raut : मुस्लिम लीग तसेच मुस्लिम समाजाने मविआ आणि इंडिया आघाडीला मतदान करावे, असा फतवा काढला जात आहे. पण मी विनंती करतो की धर्मांच्या नावावर मतदान न करता, राष्ट्रभक्तीच्या नावावर मतदान करावं असं नितेश राणे म्हणाले. तसेच कर्नाटकमध्ये काँग्रेस निवडून आल्यानंतर तिथे काय झालं ते पहा. आज आपण हिंदू म्हणून आपल्या घरात आणि दुकानावर भगवे झेंडे लावल्याचे दिसताहेत. श्रीरामांचे झेंडे दिसतात, घरात देवतांची पूजा करत आहोत; पण जर इंडिया आघाडीचे सरकार आले तर आपल्याला आपल्या भारतामध्ये राहून हे सर्व करता येणार नाही, असा निशाणा नितेश राणेंनी इंडिया आघाडीवर साधला. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
आघाडीला मत म्हणजे लव्ह जिहादला मत : महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत कोरोनाच्या नावाने अनेक हिंदू सणांवर बंदी होती; मात्र मोहरम आणि बकरी ईद साजरी केली जात होती. जर उद्या इंडियाचे सरकार आले तर कोरोनाकाळासारखी परिस्थिती होईल. हिंदूंचे सण, उत्सव सोडा पण तुमच्या घरातल्या मंदिरातील पूजेसाठी तुम्हाला परवानगी घेण्यापासून हे सगळे प्रश्न निर्माण होतील. म्हणून आवर्जून सांगतो की, इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला मत म्हणजे, लव्ह जिहादला मत देण्यासारखे आहे, असं नितेश राणे म्हणाले.
फक्त १५ मिनिटं सुरक्षा काढा : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर चंद्रशेखर बावनळकुळे यांनी हा काळूबाळूचा तमाशाचा फड होता अशी टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, बावनकुळे यांच्या कानाxx मारली पाहिजे, यावर बोलताना नितेश म्हणाले की, कानाXX मारण्याची भाषा सगळेजण करू शकतात; पण माझी राज्य सरकार आणि गृहखात्याला विनंती आहे की, संजय राऊत यांच्याकडे जे पोलीस संरक्षण आहे. ते फक्त पंधरा मिनिटांसाठी हटवा आणि बघा हा राजाराम राऊतचा मुलगा म्हणून तरी ओळखला जातो का? ते बघा…, असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
मुलाखती की हनिमून ट्रिप : पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, आपल्या घरातल्या कामगाराची जी काही मुलाखत घेतली आहे तो इंटरव्ह्यू होता की हनिमून ट्रिप होती, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. हिंदू समाज आणि रामभक्त यांना भाजपमुक्त करायचे आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण आम्ही म्हणतो की, हिंदू समाजाला उद्धव ठाकरे मुक्त करायचे आहे, असे नितेश राणे म्हणाले.
हेही वाचा :
- तुरुंगातून सुटून आलेल्या अरविंद केजरीवाल यांचा मोदींच्या गॅरंटीला मोठा शह, जाहीर केली मोठी घोषणा - Arvind Kejriwal news
- "हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी...", चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हानं - Chandrashekhar Bawankule
- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान; महाराष्ट्रातील 'या' 11 मतदारसंघांत होणार चुरशीची लढत - Lok Sabha Elections 4th Phase