ETV Bharat / state

शरद पवारांसारखे नास्तिक वारीत कसे चालणार? भाजपाची टीका - BJP criticizes Sharad Pawar - BJP CRITICIZES SHARAD PAWAR

BJP criticizes Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार नाहीत. खुद्द शरद पवार यांनीच याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी' वारीत धावणार ही बातमी खोटी असल्याचं शरद पवार म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात खुलासा केला. त्यावरून भाजपानं टीका केलीय.

Sharad Pawar, Acharya Tushar Bhosale
शरद पवार, आचार्य तुषार भोसले (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 5:35 PM IST

आचार्य तुषार भोसले यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

मुंबई BJP criticizes Sharad Pawar : यंदाच्या आषाढी वारीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, मी आषाढी वारी पायी चालणार नसल्याचं खुद्द शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळं बातमी खोटी होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावरुन आता भाजपानं शरद पवार यांच्यावर टीका केली. "शरद पवारांसारखे नास्तिक वारीत चालणार तरी कसे, हा प्रश्न वारकऱ्यांना यापूर्वीच पडला होता. शेवटी ही अफवाच निघाली," अशी टीका भाजपा आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष, आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

स्वागतासाठी 'मी' उभा राहणार : शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत बारामती ते इंदापूरमधील सणसपर्यंत पायी चालत वारीत सहभागी होणार, अशा बातम्या रंगल्या होत्या. पण मी वारीत सहभाग होणार नाही, असं शरद पवारांना वारीतील सहभागाबद्दल कधीच सांगितलं. मात्र, "वारी माझ्याच्या गावातून जाते, त्यामुळं शरद पवार सहभागी झाल्यास 'मी' त्यांच्या स्वागतासाठी उभा राहीन," असं आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं. मात्र, शरद पवारांनी मी वारीत चालणार नसल्याचं सांगितलंय. मी वारीत चालण्याच्या बातम्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पेरल्या गेल्याचं ते म्हणाले.

वारकरी मतं मिळवण्यासाठी : शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजपानं टीका केलीय. भाजपाचे अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष, आचार्य तुषार भोसले यांनी याबाबत सांगितलं की, "आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांनी वारकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी बातम्या पेरल्या होत्या. महाविकास आघाडीच्या काही लोकांनी शरद पवार वारीत चालणार, अशा खोट्या बातम्या पसरवल्या. परंतू सर्वच वारकरी संप्रदायाला शरद पवारांसारखा नास्तिक माणूस वारीत चालणार तरी कसा? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आज खुद्द शरद पवारांनी या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितलंय."

हे वाचलंत का :

  1. उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या चित्रामुळेच... देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर - Sanjay Raut News
  2. "अर्जुनाला जसा डोळा दिसत होता, तसं..." शरद पवारांचं निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य - SHARAD PAWAR News
  3. फ्रान्समध्ये नॅशनल लोकसभेच्या 577 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान - French parliamentary election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.