शिमला : Rajya Sabha election 2024 : हिमाचल प्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हर्ष महाजन यांनी बाजी मारली आहे. मतमोजणीत दोन्ही उमेदवारांमधील लढत बरोबरीत असून दोन्ही उमेदवारांना 34-34 मते मिळाली. त्यानंतर लॉटरी काढत यामध्ये उमेदवाराला विजयी घोषीत करण्यात आलं. 6 काँग्रेस आणि 3 अपक्ष आमदारांनी क्रॉस व्होट केलं होतं. त्यामुळे पूर्ण बहुमत असलेल्या काँग्रेस सरकारमध्येही पक्षाला राज्यसभेची निवडणूक जिंकता आली नाही. काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना उमेदवारी दिली होती. तर, भाजपानं 40 वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेले हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली होती. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्ष महाजन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
भाजपकडून आमदारांवर दबाव टाकण्याचं काम : हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याच्या बातम्या येत आहेत. याबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखू यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "विरोधक हिमाचलमध्ये गुंडगिरी करत आहेत. हे हिमाचलची जनता कदापी स्वीकारणार नाही, असं सांगितलं. हरियाणा पोलीस आणि सीआरपीएफनं 5 आमदारांना सोबत घेतलं आहे. त्यांनी आमच्या आमदारांचं अपहरण केलं आहे. भाजपा आमदारांवर दबाव टाकण्याचं राजकारण करत आहे.
लोकांवर इतका दबाव आणू नका : निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगची भीती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना सतावत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सुखू तणावात आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, "भाजप नेते वारंवार येऊन मतमोजणी थांबवण्याबाबत बोलत आहेत. त्यांना मतदान का करू दिले? असा सवाल भाजपe नेते करत आहेत. मतदान होऊ दिलं नाही तर राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कशी सुरू होणार? मी भारतीय जनता पक्षाच्या हिमाचल युनिटच्या नेत्यांना धीर धरायला सांगू इच्छितो. लोकांवर इतका दबाव आणू नका, असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :
1 बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी
2 हिमालयात तपश्चर्या नाही, यांनी केलं लग्न! उणे 25 अंश सेल्सिअस तापमानात झालं डेस्टिनेशन वेडिंग