ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची सलामत, पण भाजपाला नंबर 1 सिद्ध करण्यासाठी मोठं आव्हान - Devendra Fadnavis - DEVENDRA FADNAVIS

Devendra Fadnavis : भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रातील पराभवानंतर याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा विश्वास कायम ठेवला असून त्यांची खुर्ची सलामत केली आहे. महाराष्ट्रात भाजपा नेतृत्वात कुठलेही बदल केले जाणार नाहीत. परंतु असं असलं तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार आणण्याबरोबर भाजपा राज्यात एक नंबरचा पक्ष राहील हे सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर फार मोठं आव्हान असणार आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 7:59 PM IST

मुंबई Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचा झालेला पराभव हा सर्वांत जास्त जर कुणाच्या जिव्हारी लागला असेल तर तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या. याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात 'अबकी बार ४५ पार' हा नारा देवेंद्र फडणवीस यांनीच दिला होता. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात झालेली फोडाफोडी, इतर पक्षातून आयात केले गेलेले नेते, निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार निवडीवरून झालेला घोळ हे सर्व महायुतीच्या खासदारांची संख्या वाढवण्यासाठी झालं असलं तरी या सर्व बाबींचा उलट परिणाम दिसून आला.

विधानसभा निवडणुका फडणवीसांच्याच नेतृत्वात : या सर्व गोष्टी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हेच हिरारीने पुढे असल्या कारणाने लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी सरकारमधून त्यांना मोकळं करण्याची विनंती भाजपा पक्षश्रेष्ठींना केली होती; परंतु त्यांनी सरकारमधून बाहेर न पडता सरकारमध्येच राहून महाराष्ट्र आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती राज्यातील ३५ लाख भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांना करण्यात आली होती. दिल्लीत मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र कोअर कमिटीची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी बैठक झाल्यानंतर राज्यात कुठलेही नेतृत्व बदल केले जाणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. याचाच अर्थ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील भाजपाची धुरा ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असून त्यांच्याच नेतृत्वात राज्यातील निवडणुका लढवल्या जाणार आहेत.

शिंदे गटाचे उमेदवार त्यांना बदलावे लागले : लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांच्यात आणि महाविकास आघाडी यांच्या मतांच्या टक्केवारीत केवळ ०.३ टक्के इतकाच फरक आहे; परंतु महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला तर महायुतीला १७ जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या केंद्रस्थानी प्रमुख नेते होते. भाजपाच्याच नाही तर शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या उमेदवार निवडीवर त्यांचच प्राबल्य होतं. भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा जो अंतर्गत सर्वे केला त्या सर्वेनुसार शिंदे गटाचे उमेदवार त्यांना बदलावे लागले होते. महायुतीत जागा वाटपावरूनसुद्धा अनेक रुसवे फुगवे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत निर्णय प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांना खुली मुभा दिली होती; मात्र इतकं असूनसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची रणनीती पूर्णतः अपयशी ठरल्याचं दिसून आलं. याचा फटका भाजपा सोबत शिंदे गट आणि अजित पवार गटालाही बसला.

कळीचा मुद्दा हा जागा वाटपाचा : भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सक्रिय होण्यास सांगितलं आहे; परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या केंद्रस्थानी असणारे फडणवीस विधानसभेसाठी केंद्रस्थानी असतील का? हा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय चुकीचे ठरले. अशा परिस्थितीत विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार नाहीत हे स्पष्ट आहे. सर्वांत कळीचा मुद्दा हा जागा वाटपाचा राहणार आहे.

महायुतीसाठी पुढील लढाई कठीणच : लोकसभेत जागा वाटपात शिंदे-पवार यांनी नमतं घेतलं; मात्र आता ती परिस्थिती राहणार नाही असे स्पष्ट संकेत शिंदे-पवार गटाच्या नेत्यांकडून देण्यात आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १५० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात आघाडीवर राहिली आहे. अशा परिस्थितीत महायुतीसाठी ही लढाई तितकी सोपी नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्णवेळ काम करता यावे म्हणून सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. याचाच अर्थ लोकसभा निवडणुकीत झालेल्या हानिकारक पराभवानंतर हा वचपा भरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काही रणनीती आखली आहे; परंतु याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना कशाप्रकारे साथ देतात यावर सर्व अवलंबून असणार आहे.

हेही वाचा :

  1. राज्यात पोलीस भरती सुरू, एका पदासाठी तब्बल 101 अर्ज, पुरेशा सुविधांअभावी उमेदवारांची गैरसोय - Maharashtra Police Recruitment
  2. एकनाथ शिंदे यांचे बंड ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत शिवसेनेत काय वादळे आली? जाणून घ्या सविस्तर - Shiv Sena Foundation Day 2024
  3. अवैध दारुसाठी डाक कंटेनरचा वापर; पालघरमधून दमण बनावटीची दारू जप्त - Liquor Seized In Palghar

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.