मुंबई IAS transfer and charge : भूषण गगराणी यांच्याकडे सध्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार होता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेतून आयुक्तांसह दोन अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली होती. यात इक्बाल सिंह चहल, अश्विनी भिडे आणि पी वेलरासू या अधिकाऱ्यांची नावे होती. अखेर यांच्या जागेवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. अमित सैनी यांची कारकीर्द : बृहन्मुंबईच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या जागी डॉ. अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आजच पदभार स्वीकारला. त्यामुळे आता पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनी हे काम पाहणार आहेत. सैनी यांनी एमबीबीएस मेडिसीन पदवी घेतली असून ते 2007 च्या IAS बॅचचे अधिकारी आहेत. यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर बुलडाणा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. नागपूर येथे कार्यरत असताना विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव या पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांनी सांभाळला. त्यानंतर त्यांनी गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची जिल्हाधिकारी म्हणून धुरा हाताळली. मुंबई विक्रीकर विभागात सहआयुक्त पदावर कामकाज पाहात असताना महाराष्ट्र राज्य लॉटरी मंडळाच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांनी हाताळला. नंतर महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडे ते जलजीवन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत होते.
अभिजीत बांगर यांचा कार्यकाळ : प्रकल्प विभागाचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्या जागी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांगर यांनी देखील आज (20 मार्च) मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत अश्विनी भिडे यांच्याकडून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे आता त्यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाची जबाबदारी असणार आहे. बांगर हे 2008 च्या IAS बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅंड इकॉनॉमिक्स येथून एम. ए. अर्थशास्त्र ही पदवी संपादित केली आहे. बांगर यांनी माणगाव येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. तसंच पालघर, अमरावती या जिल्ह्यांची जिल्हाधिकारी म्हणून धुरा सांभाळली. तेथून नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ही पदं सांभाळल्यानंतर अलीकडे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून ते कामकाज पाहात होते.
हेही वाचा :
- Lok Sabha Elections : अजित पवारांनी केलं दोन पिढ्यांचं नुकसान; 'मी बारामतीतूनच लढणार', शिवतारेंच्या भूमिकेमुळं महायुतीत संघर्ष
- MP Vinayak Raut : दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा जाहीर होतील - खासदार विनायक राऊत
- Babasaheb Shinde : आमदार खासदार होण्यासाठी पठ्ठ्याने विकली तब्बल पन्नास एकर जमीन; २३ निवडणुका हरला, पुन्हा लोकसभा लढणार