ETV Bharat / state

जुगाराच्या नादात वृद्ध महिलेची हत्या; घराला आग लावून दागिनेही पळवले; आरोपीला 36 तासात अटक - Bhiwandi Crime News

Bhiwandi Crime News : भिवंडी तालुक्यातील झाटेपाडा येथं आरिफ फार्म हाऊसमध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या तरुणाला भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केलीय. कर्ज फेडण्याकरिता त्यानं ही हत्या करून महिलेचे दागिने चोरल्याची बाब पोलीस तपासात समोर आलीय.

Bhiwandi Crime News
Bhiwandi Crime News (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 9:11 PM IST

ठाणे Bhiwandi Crime News : ऑनलाईन जुगार खेळाच्या नादात कर्जबाजारी झालेल्या तरुणानं कर्ज फेडण्यासाठी हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय. ही घटना भिवंडी तालुक्यातील झाटेपाडा येथील फार्म हाऊसमध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या दिवशी वयोवृद्ध महिलेचा गळा कापून अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने चोरी केली. तेवढ्यावच न थांबता घराला आग लावून आरोपी फरार झाला होता. मात्र, भिवंडी ग्रामीण पोलिसांनी तपास करत आरोपीला 36 तासाच्या आत अटक केली. अभिमन्यु गुप्ता असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक (Source - ETV Bharat Reporter)

नेमकं प्रकरण काय ? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास मृत सेल्वामेरी अगस्टीन नाडर घरात एकट्याच असताना अभिमन्यु गुप्ता त्यांच्या घरात शिरला. त्यानं धारदार हत्यारानं वार करत या वृद्ध महिलेला ठार मारलं. त्यानंतर महिलेच्या अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने चोरी केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं घराला आग लावून आरोपीनं पळ काढला. याप्रकरणी गावातील पोलीस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सापळा रचून अटक- गुन्हा दाखल केल्यानंतर भिवंडी तालुका पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस तपासात मृत महिलेच्या मुलाकडे दूध डेअरीवर पूर्वी काम करणारा अभिमन्यु हा घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. तपासात सदरचा गुन्हा हा अभिमन्यु गुप्ता यानं केल्याचं निष्पन्न झालं. त्याचा शोध सुरू केला असता आरोपी ठाण्यातील एका लॉजमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 16 ऑगस्ट रोजी ठाण्यातील कापूरबावडी परिसरात असलेल्या लॉजवर सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं.

आरोपीनं दिली कबुली : पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. महिलेच्या मुलाकडे कामाला असताना घरात दागिने असल्याचं आरोपीला माहित होतं. त्यातच ऑनलाईन रमी जुगारात एक ते दीड लाख कर्ज झाले. ते कर्ज फेडण्यासाठी आरोपीनं महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील आणि घरातील दागिने घेतले. हत्येचा संशय येऊ नये म्हणून घराला आग लावली, अशी कबुली त्यानं पोलिसांना दिली. आरोपीला 17 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केलं असता 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा

  1. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मित्राची हत्या, अवघ्या तीन तासांत उरण पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या - Navi Mumbai crime
  2. अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला महिलेनं शिकवला धडा, उलतण्यानं हल्ला केल्यानं नराधमाच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर जखम - Thane Crime News
  3. महाराष्ट्रातील 5 महिला भाविकांना उत्तराखंडमध्ये चिरडणाऱ्या टँकर चालकाला अटक - Srinagar Tanker Driver Arrest

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.