ETV Bharat / state

Rahul Gandhi : इलोक्टोरल बाँड हे पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट- राहुल गांधी - Rahul Gandhi Speech Bhiwandi

Rahul Gandhi On PM Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी (15 मार्च) भिवंडीत दाखल झाली. भिवंडी वाडा मार्गानं ही यात्रा सायंकाळी वंजारपट्टी नाका येथून शहरात दाखल झाली. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi Slams Narendra Modi Said that Electoral Bond is worlds biggest racket run by PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 9:20 PM IST

राहुल गांधी भिवंडी पत्रकार परिषद

ठाणे Rahul Gandhi On PM Narendra Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूरहून सुरू केलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चं आज (15 मार्च) भिवंडीत आगमन झालं. शहरातील मनपा मुख्यालयाच्या समोर असलेल्या धर्मवीर आनंद दिघे चौक येथे राहुल गांधी यांची चौकसभा होणार असल्यानं दुपारपासूनच या ठिकाणी नागरिकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले राहुल गांधी? : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली. पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठं हप्तावसुली रॅकेट असून सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली जात आहे. भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे", असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

...हा तर राष्ट्रद्रोह : पुढं ते म्हणाले की, "एखाद्या कंपनीवर सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई होते. त्यानंतर ती कंपनी बाँड खरेदी करते हे उघड झालंय. काही कंपन्यांना राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, टनेलचे कंत्राट देऊन त्या कंपन्यांकडून मोठी वसुली केली जात आहे. हा गंभीर गुन्हेगारीचा प्रकार असून राष्ट्रद्रोह आहे. तसंच या घोटाळ्यात नितीन गडकरींचा सहभाग नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच हात आहे. तसंच सीबीआय, ईडी या संस्था भाजपा आणि आरएसएसच्या शस्त्र बनल्या आहेत. परंतु भाजपाची कधीतरी सत्ता जाईल आणि त्यावेळी जी कारवाई होईल ती अत्यंत कठोर असेल."

सर्वाधिक पैसा भाजपाला मिळाला : काँग्रेससह विरोधी पक्षांनाही या बाँडचे पैसे मिळाले आहेत. यासंदर्भात विचारण्यात आलं असताना राहुल गांधी म्हणाले की, "यातील सर्वात जास्त पैसा भाजपाला मिळालाय. 10-20 टक्के पैसा विरोधी पक्षांना मिळाला असेल. परंतु काँग्रेसकडं हायवे किंवा इतर कंत्राट देण्याचे अधिकार नाहीत." तसंच सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांच्यावर विरोधी पक्षांचं नियंत्रण नाही. या सर्व संस्था पंतप्रधानांच्या नियंत्रणात असल्याचंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

जातीनिहाय जनगणना करणं आवश्यक : "भाजपानं सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, आदिवासी, दलित आणि इतर मागासवर्गीय दुर्लक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रथम जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही मागणी रेटून धरत आहोत", असं ते म्हणाले. तसंच शेतकरी न्याय हमी योजनेच्या पंचसूत्री कार्यक्रमाबद्दल माहिती देत देशातील प्रत्येक कुटुंबाचे किमान उत्पन्न एक लाखापर्यंत आणून देशातील गरिबी हटवण्याचा मनोदय राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. Rahul Gandhi Speech : ओबीसी नसलेले पंतप्रधान मोदी दलित आदिवासांची कैवार घेतीलच कसा, राहुल गांधींचा पालघरमधून मोदींवर हल्लाबोल
  2. Bharat Jodo Nyay Yatra: गरिबांवर अन्याय होत असल्यानं 'न्याय' हा शब्द यात्रेत जोडला- राहुल गांधी
  3. Rahul Gandhi : मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख करोड रुपये माफ केले, शेतकऱ्यांचा एक रुपयाही नाही; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.