ETV Bharat / state

बीडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली; सर्व शाळांना सुट्टी जाहीर - Manoj Jarange Patil Shantata Rally - MANOJ JARANGE PATIL SHANTATA RALLY

Manoj Jarange Patil Beed Rally : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज (11 जुलै) बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज बीडमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

Beed School Holiday today 11 july due to Manoj Jarange Patil Shantata Rally
मनोज जरांगे यांच्या रॅलीमुळं बीडमधील शाळांना आज सुट्टी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 11:06 AM IST

बीड Manoj Jarange Patil Beed Rally : सकल मराठा समाजाच्या वतीनं आज (11 जुलै) बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात 'शांतता रॅली'चं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीदरम्यान होणाऱ्या गर्दीमुळं शाळकरी मुलांची गैरसोय होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलीय. याबाबतचं पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलं असून सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्यात.

Beed School Holiday today 11 july due to Manoj Jarange Patil Shantata Rally
बीडमधील शाळांना आज सुट्टी (ETV Bharat Reporter)

बीडमध्ये निघणार शांतता रॅली : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जरांगे पाटील यांनी सरकारला सगेसोयरे संदर्भात दिलेला अल्टीमेटम 13 तारखेला संपणार असून याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीच्या अनुषंगानं मराठा समन्वयकांकडून नाश्ता, पाणी, पार्किंग, ॲम्बुलन्स, याची व्यवस्था करण्यात आलीय. या रॅलीसाठी मराठा बांधवाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून बीड शहरात मोठमोठे बॅनर, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीली सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार असून त्यानंतर जरांगे पाटील यांची सभा पार पडेल.

शांतता रॅलीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज बीडमध्ये शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क झालं असून जवळपास 250 पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांसह एसआरपीएफची एक तुकडी आणि आरसीपीचे 3 प्लाटून नियुक्त करण्यात आलेत. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी यासंदर्भातील आढावा घेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

हेही वाचा -

  1. मला गोळ्या घातल्या तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही; अंतरवालीत घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर जरांगे यांची प्रतिक्रिया - Manoj Jarange Patil
  2. भुजबळांचं तलवारी घासून ठेवण्याचं आवाहन, तर आम्हीही शांत बसणार नाही असा जरांगेंचा इशारा - Manoj Jarange Patil PC
  3. ...अन्यथा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मूळ आरक्षण सोडून सर्व रद्द करा - मनोज जरांगे पाटील - Maratha Reservation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.