पुणे Uddhav Thackeray - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदाच्या बाबत चर्चा सुरू आहे. अशावेळी शिवसेनेकडून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं जात आहे तर महाविकास आघाडीमधील घटक पक्षाकडून मात्र निवडणुकीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितल जात आहे. त्यातच आता पुण्यात पुन्हा एकदा शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षाकडून बैठका रॅली आणि सभा घेतल्या जात आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शहरातील विविध भागात "महाराष्ट्र वाट पाहतोय साहेब या दिवसाची कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे" 2024 या मजकुराचे वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आनंद गोयल यांनी फ्लेक्स लावले आहेत. त्यानी लावलेल्या या फ्लेक्सची शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
महा विकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरील पुन्हा एकदा अंतर्गत वाद सुरू झालेला पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांना पुढे केले जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री पदात आम्हाला रस नसल्याचं थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. तसेच काँग्रेस कडून निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र ठरवलं जात जात आहे. असं असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा पुणे शहरात बॅनर लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आला आहे.
हेही वाचा..