मुंबई - वांद्रे रेल्वे स्थानकावर रविवारी चेंगराचेंगरीत नऊ जण जखमी झाले. त्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांनी रेल्वेच्या व्यवस्थापनावरून टीका केली. पश्चिम रेल्वेनं सणासुदीत वाढत्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई विभागातील अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या निर्बंध लादले आहेत.
दिवाळी सणाकरिता मूळ गावी आणि राज्यात घरी परतण्याकरिता अनेक जण रेल्वे प्रवाशाला पसंती देतात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी होत आहे. दिवाळीसह छट पूजेकरिता उत्तर भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबईवरून प्रवास करतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता मुंबई ते गोरखपूर या दोन विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. अशा स्थितीत चेंगराचेंगरीची घटना घडल्यानं रेल्वे प्रशासनानं मुंबई विभागातील प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील तिकीट विक्रीला निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधना आणि सुरत स्थानकाचा समावेश आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकीट विक्रीवरील निर्बंध 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू होणार आहेत.
उद्घाटन और प्रचार तभी अच्छे हैं जब उनके पीछे ऐसी बुनियाद हो जो जनता की सेवा के लिए असल में काम करे। जब सार्वजनिक संपत्ति के रख-रखाव के अभाव और उपेक्षा के कारण लोगों की जान जाने लगे और पुल, प्लेटफार्म या मूर्तियां रिबन काटने के साथ ही गिरने लगें, तो यह गंभीर चिंता का विषय है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 27, 2024
हाल… pic.twitter.com/CTrotNFOvI
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची गरज- वांद्रे रेल्वे स्टेशवरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून लोकसभेतेली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले," वांद्रे टर्मिनस येथे झालेली चेंगराचेंगरीची घटना म्हणजे भारताच्या ढासळत्या पायाभूत सुविधांचे प्रतिक आहे. देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची गरज आहे. जनतेच्या सेवेसाठी एक पाया असतो, तेव्हाच उद्घाटन आणि प्रसिद्धी चांगली होते. देखभालीअभावी आणि निष्काळजीपणामुळे सार्वजनिक मालमत्ता, पूल, प्लॅटफॉर्म किंवा पुतळे रिबन कापताच कोसळणं ही गंभीर चिंतेची बाब आहे."
प्रसिद्धी मिळवणं हा सरकारचा हेतू- लोकसभेचे विरोधी पक्षनेते गांधी यांनी म्हटले, "गेल्या वर्षी जूनमध्ये बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेत 300 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. मात्र, भाजपा सरकारनं पीडितांना भरपाई देण्याऐवजी त्यांना कायदेशीर लढाईत अडकून ठेवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा अवघ्या 9 महिन्यांत कोसळला. याचा स्पष्ट अर्थ आहे, त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवणं हा हेतू होता. त्यांना शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही. तसचे लोकांच्या सुरक्षेची काळजी नाही."
- राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार ) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून सरकारवर टीका केली. जयंत पाटील म्हणाले, "सरकार चांगली व्यवस्था देण्यात अपयशी ठरले आहे. अशा घटना सातत्यानं घडत आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. वांद्रे येथील दुःखद घटनेचा आम्ही निषेध करतो."
रेल्वेमंत्र्यांच लक्ष केवळ निवडणुकीवर- शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रवक्ते आनंद दुबे यांनी महायुती सरकारवर टीका केली. दुबे यांनी म्हटले, " महाराष्ट्रात लोकांच्या आयुष्याची किंमत कमी झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याला महत्त्व नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी देखील आहेत. ते सार्वजनिक सुरक्षेबाबत कोणतीही जबाबदारी दाखवत नाहीत. त्यांचे लक्ष केवळ भाजपाला महाराष्ट्रातील निवडणुकीत यश मिळवून देण्यावर केंद्रित आहे.
रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी दुर्घटनेची होणार चौकशी- वांद्रे येथील केबी भाभा म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ सुशील यांनी सांगितले , रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत एकूण 10 जण जखमी झाले होते. त्यापैकी 5 जणांना दाखल करण्यात आले. 3 जखमींना डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचारांसाठी 2 गंभीर जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वांद्रे रेल्वे दुर्घटनेचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चौकशी दिले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी पंजाबमध्ये बोलताना घटनेची चौकशी करून शोधले जाणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा-