ETV Bharat / state

आमचे चार ते पाच जण निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू; बच्चू कडू कडाडले - CHIEF MINISTER EKNATH SHINDE

आमचे चार ते पाच आमदार निवडून आले तर आम्ही मुख्यमंत्र्यांचं गणपती करू, अशा इशाराच बच्चू कडू यांनी दिलाय.

bacchu kadu
बच्चू कडू (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2024, 3:22 PM IST

नांदेड- प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. जाती-धर्माच्या पलीकडे शेतकरी अन् शेतमजुरांचे प्रश्न घेऊन परिवर्तन आघाडी मैदानात उतरलीय. तसेच ही आघाडी आर्थिक विषमता दूर करणार आहे. आमचे चार ते पाच आमदार निवडून आले तर आम्ही मुख्यमंत्र्यांचं गणपती करू, अशा इशाराच बच्चू कडू यांनी दिलाय. परिवर्तन आघाडीचा पहिला उमेदवार सुभाष साबणे यांनी देगलूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

सुभाष साबणेंकडून उमेदवारी दाखल: नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातून माजी आमदार सुभाष साबणे यांनी उमेदवारी दाखल केलीय. प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत रॅली काढून साबणे यांनी परिवर्तन महाशक्तीकडून उमेदवारी दाखल केलीय. सुभाष साबणे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपाचा राजीनामा देऊन परिवर्तन महाशक्तीमध्ये प्रवेश केलाय.

चार ते पाच जण निवडून आले : नांदेड जिल्ह्यात देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून सुभाष साबणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत देगलूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ही लढाई खऱ्या अर्थाने आर्थिक विषमतेच्या विरोधात लढली जाणार आहे. भाजपा आणि काँग्रेसच्या बजेटमध्ये तसा काहीच फरक नाही. सुभाष साबणे हे या देगलूर विधानसभा मतदारसंघात ताकतीने लढणार आहेत. सुभाष साबणे आणि मी विधानसभेत सोबत होतो. आजच्या रॅलीने अर्ध चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात पाडापाडी होणारच आहे, यामध्ये परिवर्तन महाशक्ती मोठी होणार हे निश्चित आहे. आमचे चार ते पाच जण निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, मग त्यांना उचलता येईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय. देगलूर बिलोलीची जनता यावेळेस बॅटच्या माध्यमातून सिक्सर मारेल, असा विश्वास परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार सुभाष साबणे यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा :

  1. घड्याळ चिन्हाचा वापर करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'या' नियमाचे करावे लागणार पालन
  2. बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार लढत; अजित पवार यांना उमेदवारी जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.