ETV Bharat / state

एसटी चालकाचा मुलगा झाला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती, ऊसतोड कामगारांचा जिल्हा बनतोय अधिकाऱ्यांचा जिल्हा - Avinash Palve Success Story

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 7:12 PM IST

Updated : Jul 14, 2024, 8:33 PM IST

Avinash Palve Success Story: बीड जिल्हा हा कधीकाळी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जायचा. याचं स्वरूप आता पालटत चाललंय. येथील उच्च शिक्षित तरुण पिढी आता स्पर्धा परीक्षांची तयारी करून कर्तृत्व गाजवत आहे. अविनाश पालवे हे त्यांच्यापैकीच एक. त्यांनी युपीएससी परीक्षेत 114वी रॅंक मिळविली आहे. त्यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे.

Avinash Palve Success Story
अविनाश पालवे (ETV Bharat Reporter)

बीड Avinash Palve Success Story : बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात अनेक लोक आपली पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार म्हणून जिल्ह्यासह बाहेरच्या राज्यात देखील ऊस तोडणीसाठी जातात. त्याचबरोबर या ठिकाणी बेरोजगारीचा देखील ठपका लागलेला आहे. या ठिकाणी कुठलाही उद्योग, व्यवसाय नसल्याने अनेक तरुण आपली उपजीविका भागवण्यासाठी पुणे, मुंबई, संभाजीनगर ज्या ठिकाणी आपल्या हाताला काम मिळेल त्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यात काम करतात.

अविनाश पालवे त्यांची यशाबद्दल सांगताना (ETV Bharat Reporter)

पालवे यांना युपीएससी परीक्षेत 114वी रॅंक : बीड जिल्ह्यात आता तरुणांनी मनावर घेतल्यामुळे अनेक तरुण एमपीएससी, यूपीएससी आणि इतर पदावर भरती होताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांचा आणि बेरोजगारांचा जिल्हा न म्हणता आता अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख झाली आहे. प्रयत्न केला तर यश मिळते हे वाक्य अविनाश पालवे यांनी खरं करून दाखवलं आहे. बीड जिल्ह्यातील अविनाश पालवे यांनी युपीएससी परीक्षेत 114वी रॅंक मिळवली आहे. अविनाश याची केंद्रीय सशस्त्र पोलीस बलामध्ये असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे. त्यांच्या गावातील नागरिकांनी मिरवणूक काढत अविनाश पालवे आणि त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार केला आहे.

प्रयत्न करणं गरजेचे - अविनाश पालवे : अविनाश पालवे यांचे वडील एक एस.टी.चालक आहेत. अविनाश पालवे यांची 2023 मध्ये युपीएससी मार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेससाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अविनाशने 114वी रँक मिळविली आहे. सशस्त्र पोलीस बलामध्ये असिस्टंट कमांडंट पदी त्यांची निवड झाली आहे. अविनाशच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी त्याचा सन्मान केला. यावेळी त्याने प्रयत्न केल्यास आपणास हमखास यश मिळते. त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

अविनाशच्या पालकांना अश्रू अनावर : अविनाशच्या वडिलांची घरची परिस्थिती बेताची असल्यानं घरी थोडीच शेती आहे. वडील एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून काम करतात. तर आई घरकाम आणि शेतीची कामे करून सर्व कुटुंबाला आधार देण्याचं काम करत असते; मात्र आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं यासाठी प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अविनाश पालवेनं अनेक वेळा प्रयत्न केले. या प्रयत्नानंतर अविनाशला अखेर यश मिळालं. त्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अविनाशने यश संपादन केले, त्याबद्दल त्याचे कौतुक होत असून आपणास आनंद झाला असल्याचं त्याचे वडील बाळासाहेब पालवे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. दोन तरुणांची यशोगाथा, एकानं हॉटेलमध्ये तर दुसऱ्यानं हमालाचं काम करत मिळवली सरकारी नोकरी
  2. MPSC Exam Result 2023 : चप्पल-जोडे शिवणाऱ्यांची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक; शिकवणी न लावता एमपीएससी उत्तीर्ण
  3. Recruitment : तरुणांसाठी खूशखबर; अडीच महिन्यात करणार हजारो जागांची भरती, शासनाचा मेगा प्लॅन

Last Updated : Jul 14, 2024, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.