ETV Bharat / state

अजित पवारांच्या वेशांतरावरुन तापलं राजकारण; वेशांतर करुन तब्बल दहा वेळा दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, विरोधक आक्रमक - Ajit Pawar Disguise Controversy

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 1:31 PM IST

Updated : Jul 30, 2024, 2:55 PM IST

Ajit Pawar Disguise Controversy : सत्ता स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत अनेकदा आपण वेशांतर करुन गेल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच भडकलं आहे. खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, अतुल लोंढे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही विरोधकांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

Ajit Pawar Disguise Controversy
संग्रहित छायाचित्र (File Photo)

मुंबई Ajit Pawar Disguise Controversy : देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सरसी झाली. तर, राज्यातील विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं बाजी मारली. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडाळीबाबत भाष्य केलं. पक्षातील बंडाळीपूर्वी आपण दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी कशाप्रकारे गेलो आणि विमान तिकिटं कशाप्रकारे बुक केले, यावरून त्यांनी माहिती दिली. मात्र अजित पवार वेशांतर करुन दिल्लीला गेल्याच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर आज तोफ डागली. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं असून विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील भाजपा आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रतिक्रिया देताना राजकीय नेते (Reporter)

विमानतळ, एअरलाइन्स कंपनीची चौकशी करा - सुप्रिया सुळे : खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अमित शाह भेटीवर निशाणा साधला. त्यानंतर "अजित पवारांनी जे केलं, ते उद्या एखादा दहशतवादी करेल," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. "राज्याचा विरोधी पक्षनेता नाव बदलून बुकिंग करतो. जेव्हा तो नेता एअरपोर्टवर जातो, त्यावेळेस त्यांचा आधार कार्ड बरोबर नाव मॅच होतं का ?. अजित पवार यांच्यासारखंच उद्या एखादा दहशतवादी नाव बदलून येईल, याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. मुंबई, दिल्ली विमानतळ आणि एअरलाईनची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विमानतळावर आधार कार्डची विचारपूस केली जाते. एव्हिएशन विभागानं याचं उत्तर दिलं पाहिजे. अजित पवार गृहमंत्री अमित शाह यांना चोरून का भेटत होते, नेमकं काय शिजत होतं," असा सवालही त्यांनी यावेळी केला.

संजय राऊतांनी मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करावा - सूरज चव्हाण : खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलं. "प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्धी भेटते म्हणून काही बरळणाऱ्या संजय राऊत यांनी एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावा. सदर उपचाराचा खर्च आम्ही उचलण्यास तयार आहे," असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे. "अजित पवार यांनी नाव बदलून गेलो, असं म्हणाले मात्र ए पवार नावानं प्रवास केल्याचं म्हटलं होतं. ए पवार म्हणजे अजित अनंतराव पवार असाच त्याचा अर्थ होतो. माध्यमांसमोर धडपड करत बोलणाऱ्या संजय राऊत यांनी आपला इलाज तातडीनं करुन घ्यावा," असा सल्लादेखील सूरज चव्हाण यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

प्रकरणाची चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे - अतुल लोंढे : काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, "भाजपा आणि शिंदे इतके सत्तातूर झाले आहेत की, देशाच्या सुरक्षेची कदर त्यांनी केली नाही. सामान्य लोकांचे जीव गेले ते गेले, आमची सत्ता टिकली पाहिजे. इतक्या खालच्या स्तराचा विचार करणारी ही लोकं आहेत. यानिमित्तानं हे उघड झालं असून हे त्यांनी उघड केलं," असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. "ही अतिशय गंभीर गोष्ट असून, यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे. कायदा सगळ्यांना सारखा असतो, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. सत्ताधाऱ्यांना वेगळा कायदा आणि विरोधकांना वेगळा कायदा हे संविधान मोडण्यासारखंच आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे," असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. लोकसभेत पत्नीच्या पराभवानंतर अजित पवार यांचा सावध पवित्रा; विधानसभा निवडणुकीसाठी आखली 'ही' रणनीती - Ajit Pawar
  2. 'ठाकरे कुटुंबीयांना अडकवण्याचा डाव' ; श्याम मानव यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप - Shyam Manav On Ajit Pawar
  3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रात्री उशिरा ‘वर्षा’वर खलबतं: राजकीय चर्चांचा पाऊस? - Shinde Fadnavis Pawar Meeting

Last Updated : Jul 30, 2024, 2:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.