ETV Bharat / state

मुंबई मॅरेथॉनमध्ये अक्षय, टायगरची बाईकवर एन्ट्री; अटल सेतू मॅरेथॉन स्पर्धेला दाखवला हिरवा झेंडा

Atal Setu Marathon Competition : मुंबईतील अटल सेतूवर आज (18 फेब्रुवारी) पहाटे पाच वाजल्यापासून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशी ही स्पर्धा आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला.

Atal Setu Marathon Competition
अटल सेतू मॅरेथॉन स्पर्धेला अक्षय कुमारने दाखवला हिरवा झेंडा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 10:57 AM IST

अटल सेतू मॅरेथॉन स्पर्धेला अक्षय कुमारने दाखवला हिरवा झेंडा

मुंबई Atal Setu Marathon Competition : देशातील पहिला सागरी पूल अर्थात अटल सेतू रविवारी खेळाडूंनी बहरून गेला होता. 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून अटल सेतू शिवडी न्हावाशेवा मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे सुरूवात झाली. यावेळी अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफनं बाईकवर एन्ट्री मारत खेळाडूंचा उत्साह वाढवला.

अटल सेतू वाहतुकीसाठी बंद : देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सेतूवर एमएमआरडीएकडून आज मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मॅरेथॉन स्पर्धेला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशानं पहाटे चारपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत अटल सेतू वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अटल सेतूवरील ही पहिली स्पर्धा होती. यात 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा प्रकारे मॅरेथॉन स्पर्धा पार पडत आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी शनिवारी परिपत्रक काढलं होतं. मॅरेथॉन स्पर्धाकरिता पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला.

अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ मॅरेथॉनला उपस्थित : अटल सेतूवर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेला अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी हजेरी लावली. सकाळी सहा वाजेनंतर 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी मॅरेथॉन स्पर्धेतीला हिरवा झेंडा दाखवला. एमएमआरडीए अधिकारी यांनी देखील हिरवा झेंडा दाखवून खेळाडूंचा उत्साह वाढवला. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय.

वाहनांना पर्यायी मार्ग : पुण्याहून अटल सेतू मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गाने बेलापूर, वाशीमार्ग पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आलाय. तसंच, जुना मुंबई-पुणे हायवे, कोकणातून येणाऱ्या वाहनांना तसेच पनवेलकडून येणाऱ्या वाहनांनादेखील गव्हाण फाटा उरणफाटा वाशीमार्गे पुढे इच्छित जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जेएनपीटीकडून मुंबईसाठी जाणाऱ्या हलक्या वाहनांना गव्हाण फाटामार्गे उलवे आम्रमार्गे वाशी खाडी पूलमार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेतून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील तसंच, मॅरेथॉनमधील वाहनांना वगळण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्याच्या सूचना
  2. 'अटल सेतू'वर सेल्फी काढणं पडलं महागात; 300 हून अधिक बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'अटल सेतू'चं उद्घाटन; मायानगरी आणखी सुपरफास्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.