ETV Bharat / state

गद्दारांना धडा शिकवा, विजय आपलाच आहे; राजन तेलींच्या पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरे कडाडले - RAJAN TELI

माजी आमदार राजन तेलींच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी जागा वाटपावर भाष्य केलंय.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2024, 6:55 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना आणि जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलीय. तर काही दिवसांतच उमेदवार आणि तिकीट वाटप केले जाणार आहे. मात्र तिकीट वाटपानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. परंतु त्याआधीच पक्षातील आयाराम-गयाराम यांना ऊत आलाय. कोकणातील भाजपा नेते राजन तेली आणि सांगोल्याचे दीपक साळुंखे यांनी शुक्रवारी शिवसेना (ठाकरे गटात) प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या दोघांचा प्रवेश झालाय. यावेळी खासदार संजय राऊत, नेते विनायक राऊत यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार राजन तेलींच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी जागा वाटपावर भाष्य केलंय.

जागा वाटपाबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय: पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील वातावरण बदललंय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. शिवसेनेला कोकणापासून आणि कोकणाला शिवसेनेपासून कोणी तोडू शकत नाहीत. नाना पटोले मविआतील घटक पक्षांना सन्मान देत नाहीत किंवा पटोले बैठकीत सहभागी असतील तर आम्ही सहभागी होणार नाही, असं आपल्या पक्षातील नेत्यांनी म्हटल्याचं विचारल्यावर उद्धव ठाकरे बोलले की, माहिती घेऊन बोलेनं. जागा वाटपाबाबत दोन-तीन दिवसात निर्णय होईल. पण कोणी कुठंपर्यंत ताणायचे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.

दीपक साळुंखे यांच्या हातात मशाल दिलीय : आज तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. माझी तब्येत ठीक नव्हती. त्यानंतर आज तुमच्यासमोर आलोय. डॉक्टर बोलले आराम करा, पण आराम करायचा किती? आज मुहूर्त चांगला आहे. चांगल्या कामाला सुरुवात करायची आहे. त्यामुळं मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर येतोय. आज आमच्या पक्षात राजन तेली आणि दीपक साळुंखे यांनी प्रवेश केलाय. मी तुमचे स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. आज तुम्ही जाहीर करा म्हणत आहात, पण अजून जागावाटप झाले नाही. पण एक सांगतो की, दीपक साळुंखे यांच्या हातात मशाल दिलेली आहे. ही मशाल घराघरात पोहोचवा. मशालीची धग काय असते हे विरोधकांना दाखवा. विजय आपलाच आहे, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

सांगोल्याचे निष्ठावंत माझ्यासोबत : संजय राऊत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबाबू पाटील यांच्यावर टीका केलीय. जे गद्दार होते ते निघून गेले. काय झाडी... काय डोंगर असे म्हणाले. पण मतदारसंघात काय काम केले हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळं आता दीपक साळुंखे यांनी आज पक्षात प्रवेश केलाय. जे गद्दार होते ते निघून गेले, खोके घेऊन निघून गेले, यापूर्वी सांगोल्यातून शिवसेनेचा जो आमदार होता तो गद्दार निघाला. परंतु सांगोल्यांची जनता मात्र शिवसेनेशी एकनिष्ठ आहे, निष्ठावंत आहे आणि याचा मला अभिमान असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.

हेही वाचा :

  1. नवनियुक्त आमदार हेमंत पाटील यांचं नांदेडमध्ये जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
  2. इकडं आड, तिकडं विहीर : शिवसेनेच्या आमदारांना अस्तित्वाची लढाई, 'या' मतदार संघात भाजपाचा उघड विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.