ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : काटोलमध्ये काका पुतण्यात रंगणार सामना ? अनिल देशमुखांविरोधात आशिष देशमुख मैदानात ?

कटोल मतदार संघात काका विरोधात पुतण्याची लढत रंगण्याची शक्यता आहे. भाजपाकडून आशिष देशमुख रिंगणात उतरण्याची शक्यता असून शरद पवारांच्या पक्षाकडून अनिल देशमुख रिंगणात उतरणार आहेत.

Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2024, 1:54 PM IST

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणाला काका-पुतण्याची आगळी-वेगळी परंपरा लाभलेली आहे. त्यात शरद पवार-अजित पवार, अनिल देशमुख आणि आशिष देशमुख यांचा समावेश आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे बहुतेक काका पुतणे आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकले आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा एकदा काका पुतण्यात राजकीय लढाई रंगणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. ते यावेळी काटोल मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसलं तरी त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी मात्र, काटोलमधून लढण्यास आपण उत्सुक असल्याचं अनेकवेळा बोलून दाखवलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात काका पुतण्याचा संघर्ष पाहण्यास मिळणार आहे.

काकांना दिला पराभवाचा धक्का : उमेदवारांकडून दावे प्रतिदावे केले जात आहे. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. मात्र, इच्छुकांनी आपल्या उमेदवारीची घोषणा स्वतःच केली आहे. आता नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. इथं काका पुतणे किंवा भावा-भावात लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2014 साली इथून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर डॉ आशिष देशमुख यांनी त्यांच्या काकांना पराभवाचा धक्का दिला. तर यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा दावा आशिष देशमुख करत आहेत. त्यामुळे काटोलची राजकीय लढाई सर्वात लक्षवेधी ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

काय आहे काटोल मतदारसंघाचा इतिहास : 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल देशमुख विजयी झाले. त्यांना 96 हजार 842 मतं मिळाली. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चरणसिंग बाबुलालजी ठाकूर 79 हजार 785 मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. 2014 मध्ये काटोल विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण 70 हजार 344 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल देशमुख यांना 64 हजर 787 मतं मिळाली. याशिवाय 2009 मध्ये काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल देशमुख विजयी झाले.

भाजपाला धक्का देत अनिल देशमुखांचा विजय : 2019 मध्ये, काटोल विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 72 हजार 288 मतदार होते. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल देशमुख विजयी झाले. त्यांना एकूण 96 हजार 842 मतं मिळाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चरणसिंग बाबुलालजी ठाकूर 79 हजार 785 मतं मिळाली.

काटोल मतदारसंघ भाजपासाठी ठरणार डोकेदुखी : प्रत्येक नेता आपल्यालाच काटोलमधून उमेदवारी कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात भारतीय जनता पक्ष काटोलची उमेदवारी कुणाला देईल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही मात्र दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. उमेदवारीवरून भाजपाचे आशिष देशमुख आणि चरणसिंग ठाकूर या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपले दावे सुरू केले आहेत.

हेही वाचा :

  1. Ashish Deshmukh Join BJP: माजी आमदार आशिष देशमुख यांची आज भाजपमध्ये घरवापसी; 'या' मंत्र्यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
  2. देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते - अनिल देशमुख - Anil deshmukh On Devendra Fadnavis
  3. "अनिल देशमुख आणि मी नागपूरमुळंच..."; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.