ETV Bharat / state

मुंबईत मराठी लोकांना ५० टक्के आरक्षित घरं, हे ठाकरेंना सुचलेलं उशिराचं शहाणपण; आशिष शेलार यांचा अनिल परब यांना टोला - Ashish Shelar Criticism Anil Parab - ASHISH SHELAR CRITICISM ANIL PARAB

Ashish Shelar Criticism Anil Parab : मुंबईत नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये 50 टक्के घरं मराठी लोकांसाठी राखीव ठेवावीत अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब यांनी केलीय. त्यावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी परब यांची मागणी म्हणजे, वरातीमागून घोडं नाचवणं असून त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण" असल्याचा टोला लगावाला आहे.

Ashish Shelar Criticism Anil Parab
आशिष शेलार, अनिल परब (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 5:22 PM IST

मुंबई Ashish Shelar Criticism Anil Parab : नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मराठी माणसांसाठी 50% घरं राखीव ठेवावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी केली होती. यावरून भाजपानं आक्रमक भूमिका घेत शिवेसेना पक्षाला (उबाठा) टोला लगावला आहे. "अनिल परब यांची मागणी म्हणजे, वरातीमागून घोडं नाचवणं असून त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे", असं मुंबई भाजपा अध्यक्ष, आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते.

आशिष शेलार यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची परवानगी : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी मुंबईमध्ये नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये 50 टक्के घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी केली आहे. तसंच याबाबत अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडं सादर केलं आहे. त्यामुळं हे विधेयक येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती विधानमंडळ सचिवांना त्यांनी केली आहे. अनिल परब यांच्या या मागणीचा आशिष शेलार यांनी समाचार घेतलाय. अनिल परब यांची मागणी म्हणजे त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचा टोला शेलारांनी लगावला आहे.

सहानुभूतीसाठी आणलेलं विधेयक : "लोकसभा निवडणुकीत मराठी माणसानं आपल्याकडं पाठ फिरवल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळं सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे विधेयक आणलं आहे. यामध्ये मराठी माणसं, मराठी माणसांच्या घराचा अजिबात विचार केलेला नाही. कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना तब्बल 50% प्रिमियम बिल्डरांना माफ केलं नसतं. जेव्हा बिल्डरांना साडेबारा हजार कोटी रुपयांची खैरात वाटली, तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यामध्ये अशी अट का टाकली नाही?", असा प्रश्न शेलारांनी उपस्थित केला.

संविधानाच्या चौकटीत विधेयकं टिकणार नाहीत : "25 वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना (उबाठा) सत्तेत होती. तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलं. अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी असा कायदा का आणला नाही. कारण उद्धव ठाकरे यांना माहीत आहे, भारतीय संविधानाच्या चौकटीत अशा प्रकारची विधेयकं टिकणार नाहीत. मराठी माणसाला फसवण्याचा नवीन धंदा (शिवसेना) उबाठा पक्षानं सुरू केला आहे. इतकीच मराठी माणसाच्या घराची चिंता असेल, तर मोहम्मद अली रोडवर निर्माण होणाऱ्या नवीन इमारतीच्या विकासामध्ये 50 टक्के मराठी माणसाला घरे देण्याचा प्रस्ताव तुम्ही ठेवणार का? तसंच असे फसवण्याचे धंदे उबाठा पक्षानं बंद करावेत", अशी टीका शेलांनी केलीय.

'हे' वाचलंत का :

  1. इंग्रजी येत नसल्यानं सुजय विखेंनी उडवली खिल्ली; शरद पवारांच्या 'या' पठ्ठ्यानं इंग्रजीत घेतली 'खासदारकी'ची शपथ - Nilesh Lanke Oath In English
  2. "महाराष्ट्रातून त्यांच्यापेक्षाही मोठे वरिष्ठ...", कंगना रणौतच्या 'त्या' मागणीवरुन संजय राऊत संतापले - Maharashtra Sadan
  3. महायुतीत मिठाचा खडा, "अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावा", चंद्रकांत पाटलांवरील 'त्या' टीकेवरुन प्रवीण दरेकर संतापले - Pune FC Road Drug Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.