नाशिक Ashadi Ekadashi 2024: जय जय राम कृष्ण हरी..ज्ञानोबा माऊली..संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले प्रांगण.. टाळ मृदुंग वाजवित हरी नामाच्या गजरात तल्लीन झालेले चिमुकले...हे दृश्य नाशिक शहरातील बॉइज टाऊनमध्ये दिसूनं आलं.
गेल्या पंधरा वर्षापासून रिंगण सोहळा साजरा: गेल्या पंधरा वर्षापासून या शाळेत रिंगन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. शाळेतील दोन हजार मुला-मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव तर कोणी रुक्माई? तर कोणी वारकरी बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगणदेखील झालं. शाळेतील शिक्षकांनी घोड्यावर बसून रिंगणाभोवती फिरवला. यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषात असलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन होते. हे जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास झाला.
रिंगण सोहळा उत्साहात साजरा- अभंगांचे गायन करून टाळ आणि वीणा यांच्या तालावर ठेका धरत शिक्षक ईश्वर काळे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी नृत्य केले. विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेच्या क्रीडागंणावर निर्माण केले. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ घातले. विद्यार्थिनी नऊवारी, अलंकार, केसात गजरा आणि डोक्यावर तुळस घेऊन या वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या. रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत सोहळ्याचा शेवट झाला.
- विद्यार्थ्यामध्ये उत्साह: एका विद्यार्थ्यानं सांगितलं, " यंदा मी वारकरी बनलोय. दिंडी सोहळ्यात रिंगण सोहळादेखील होतो. गेल्या आठ दिवसापासून आम्ही तयारी केली आहे.या सोहळ्यामुळे आम्हाला वर्षभर स्फूर्ती मिळते."
हेही वाचा
- ‘याचि देही याचि डोळा'!; इंदापुरात पार पडले तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे रिंगण; पाहा गोल रिंगणाचे ड्रोन दृश्य - Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala
- विठू नामाच्या गजरात वारकऱ्यांची मेट्रो सफर ते दिवे घाटाकडं प्रस्थान, पाहा पुण्यातील आषाढी वारी! - Ashadhi Wari 2024
- वारकऱ्यांची मेट्रो वारी ! पिंपरी मेट्रोत 'जय जय राम कृष्ण हरी'चा जयघोष - Pimpri Metro Trave