ETV Bharat / state

माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा २५ वर्षानंतर कुऱ्हाडे कुटुंबाला मान, पाहा 'बाजी- हौशा' बैलजोडीची तयारी - Ashadhi Ekadashi 2024 - ASHADHI EKADASHI 2024

Ashadhi Ekadashi 2024 : ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदीत सुरू आहे. या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींचा चांदीचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुऱ्हाडे कुटुंबियांच्या 'हौश्या आणि बाजी' या बैलजोडीला मिळालाय. याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 1:53 PM IST

सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीची आहे बैलजोडी (ETV BHARAT Reporter)

पुणे Ashadhi Ekadashi 2024 : यंदा बैलजोडीच्या मानासाठी आळंदी गावातील कुऱ्हाडे परिवाराकडून 7 अर्ज आले होते. त्यापैकी कुऱ्हाडे घराण्यातील सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या 'बाजी आणि हौश्या ' या बैलजोडीला मानाचा पालखी रथ ओढण्याचा बहुमान मिळाला. हा मान तब्बल 25 वर्षानंतर मिळाल्यानं कुऱ्हाडे परिवारात आनंदाचं वातावरण आहे.

'बाजी आणि हौश्या ' ही बैलजोडी माऊलीच्या पालखी रथासोबत आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणार आहे. त्यासाठी नियमित बैलजोडीचा सरावदेखील सुरू असल्याचं कुऱ्हाडे कुटुंबीयांनी म्हटलंय. कुऱ्हाडे कुटुंबीयांनी कर्नाटक राज्यातील यादवाड आणि नंदगाव या दोन गावातून प्रत्येकी एक-एक बैल खरेदी केलाय. सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीची ही बैलजोडी तयार करण्यात आलीय.

बैलांची खुराक : बैलांच्या रोजच्या आहारात खुराक म्हणून उडीद डाळ, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, मका भरडा, गहू भुसा, गव्हाचे पीठ, शाळू कडबा व दूध दिलं जाणार आहे. तर गोठ्यात बैलांच्या पायाला किंवा शरीराला कुठलीही इजा होऊ नये, या उद्देशानं गोठ्यात गादीदार वस्तूंचा वापर केला जात आहे. बैलांची वैद्यकीय तपासणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक औषध लसीकरणही केलं जाणार आहे.

मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश : यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी 29 जूनला आळंदीतून पंढरपूरकडं प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरातील वारकरी संख्या ठरविण्यासंदर्भात जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी प्रमुख, फडकरी, मानकरी, चोपदार, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आळंदी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादिनी देऊळवाड्यात गर्दी होऊ नये, यासाठी दिंड्यांमधील वारकऱ्यांना मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे. माऊलींच्या रथापुढील 20, मागील 27 आणि 9 उप दिंड्या अशा एकूण 56 दिंड्यांतील प्रत्येकी 90 वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा

  1. डोंबिवलीत पुन्हा अंग्नितांडव; औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीत स्फोट, धुराच्या लोटानं नागरिक हैराण - Dombivli Blast Fire
  2. पुरुष आयोगासाठी 'या' दोघांनी काढली भारतभर बाईक रॅली... - Bike Rally For Purush Aayog
  3. मुलूंड न्यायालयाच्या नव्या इमारतीबाबत तोंडी नको, लेखी हमी द्या- मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Mulund Court New Building Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.