ETV Bharat / state

एनडीएच्या पासिंग आऊट परेडला सैन्यप्रमुखांनी लावली हजेरी, महिला कॅडेट्सचं केलं कौतुक - NDA Passing Out Parade

NDA Passing Out Parade : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 146 व्या अभ्यासक्रमाची पासिंग आऊट परेड पुण्यातील खडकवासला येथे पार पडली. यावेळी सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी महिला कॅडेट्सचं कौतुक केलं.

Army Chief General Manoj Pande
सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 11:00 AM IST

पुणे NDA Passing Out Parade : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 146 व्या अभ्यासक्रमाची पासिंग आऊट परेड पुण्यातील खडकवासला येथे पार पडली. या परेडमध्ये सैन्य प्रमुख जनरल मनोज पांडे हे समीक्षा अधिकारी म्हणून सहभागी झाले होते. यावेळी बोलत असताना मनोज पांडे यांनी महिला कॅडेट्सचं कौतुक केलं. तसंच "परेडमधील महिला कॅडेट्स खरोखरच नारी शक्ती आणि सर्वसमावेशक सशस्त्र दलांप्रती आमची बांधिलकी दर्शवितात", असंही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले मनोज पांडे? : यावेळी सर्व कमांडर आणि कॅडेट्सला शुभेच्छा देत जनरल मनोज पांडे म्हणाले की, "तुमच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगी तुम्हाला संबोधित करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी कमांडर आणि सर्व कॅडेट्सचं त्यांच्या चांगल्या सरावासाठी अभिनंदन करू इच्छितो. तुमच्यापैकी प्रत्येकजण वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आला असला तरी सर्वांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे. ती म्हणजे तुम्ही निवडलेली सैनिकाची नोकरी आहे", असं जनरल पांडे म्हणाले.

तांत्रिक क्षमतेचा उंबरठा वाढवण्याची आवश्यकता : पुढं बोलत असताना भविष्यातील वाढत्या गुंतागुंतीच्या आणि स्पर्धात्मक रणांगणांमध्ये प्रभावीपणे काम करण्यासाठी कॅडेट्सनी त्यांची तांत्रिक क्षमता वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, "आणखी एका वर्षाच्या कालावधीत तुम्हाला अधिकारी म्हणून नियुक्त केलं जाईल. त्यामुळं तंत्रज्ञान, अंतराळातील प्रगती, सायबर आणि माहिती डोमेन, पारंपारिक साधनांच्या क्षमतांमध्ये प्रगती युध्दामुळं युद्धक्षेत्राला अधिक गुंतागुंतीचे, स्पर्धात्मक आणि प्राणघातक कार्य करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या तांत्रिक क्षमतेचा उंबरठा वाढवण्याची आवश्यकता आहे," असा सल्लाही पांडे यांची यावेळी सर्व कॅडेट्सना दिला.

हेही वाचा -

  1. मुंबईतील महायुतीच्या सभेपूर्वी पंतप्रधान मोदी 'या' तीन स्मृतीस्थळावर करणार अभिवादन - NDA vs INDIA Bloc in Mumbai
  2. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल ; चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केला विश्वास, महालक्ष्मी मंदिरात घेतले आशीर्वाद - Chandrababu Naidu On NDA Gov
  3. एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या पंतप्रधानांच्या ऑफरवर शरद पवार म्हणाले," आम्ही गांधी आणि नेहरुंच्या..." - Sharad Pawar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.